नाशिक : विवाहाचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार, वैवाहिक असल्याचे लपवले | पुढारी

नाशिक : विवाहाचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार, वैवाहिक असल्याचे लपवले

नाशिक : वैवाहिक असल्याचे लपवून सोशल मीडियावरून ओळख झालेल्या महिलेसोबत प्रेमसंबंध प्रस्थापित करून एकाने वारंवार अत्याचार केल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी पीडितेच्या फिर्यादीनुसार मुंबई नाका पोलिस ठाण्यात तिघांविरोधात बलात्कार, फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडितेने दिलेल्या फिर्यादीनुसार, जानेवारी 2020 ते मार्च 2021 या कालावधीत संशयितांनी बलात्कार व फसवणूक केली. संशयित विनोद वसंतराव ढाकणे (45, रा. भाऊसाहेब हिरेनगर, नाशिक – पुणे रोड) यांनी फेसबुकवरून ओळख करून पीडितेसोबत विवाह केला. विवाहाआधी विनोद यांनी पहिल्या पत्नीपासून घटस्फोट घेतल्याचे पीडितेस सांगितले. मात्र, घटस्फोट घेतलेला नव्हता.

हेही वाचा :

Back to top button