

मंचर : पुढारी वृत्तसेवा
जिल्हा बँकेच्या वतीने उत्कृष्ट कामगिरी केलेल्या संस्थांचा मंचर (ता. आंबेगाव) येथे धनादेश देऊन सत्कार करण्यात आला.
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सन 2020-21 आर्थिक वर्षात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या संस्थांचा ढाल देऊन सन्मान, तसेच बँकेच्या धर्मादाय निधीमधून जिल्हा परिषद प्राथमिक शाळांना आर्थिक साहाय्य धनादेश वितरण मंचर बाजार समितीच्या सभागृहात पार पडले.
शरद सहकारी बँकचे अध्यक्ष देवेंद्रशेठ शहा, बँकचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम, आंबेगाव तालुका खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष भगवानराव वाघ, माजी उपसभापती गणपतराव इंदोरे, भीमाशंकर साखर कारखान्याचे संचालक शांताराम बापू हिंगे पाटील, रामचंद्र ढोबळे आदी यावेळी उपस्थित होते.
भैरवनाथ विद्याधाम प्रशाला लोणी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव कशिंबेग, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव कशिंबेग, विद्या विकास मंदिर अवसरी बद्रुक यांना प्रत्येकी पन्नास हजार रुपयांचा धनादेश, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चांडोली खुर्द, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पेठ यांना प्रत्येकी पंचवीस हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला.
जारकरवाडी सहकारी संस्थेची जिल्हा पातळीवरील ढालीसाठी निवड, तर गिरवली सोसायटीची तालुका पातळीवरील ढालीसाठी निवड झाल्याबद्दल पुरस्काराचे वितरण करण्यात आले. स्वागत एस. के. अरगडे, प्रास्ताविक बँकेचे विभागीय अधिकारी ए. बी. थोरात यांनी केले.
हेही वाचा