चापेकर चौकातील खडीमुळे अपघाताचा धोका | पुढारी

चापेकर चौकातील खडीमुळे अपघाताचा धोका

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा

चिंचवड गावातील चापेकर चौकातील रस्त्याचे काम गेल्या अनेक महिन्यांपासून रखडले आहे. कामाची खडी सर्वत्र पसरल्याने दुचाकी घसरून अपघाताच्या घटना घडत आहेत. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी शहरातील रस्त्यांची डागडुजी करण्याची मागणी परिसरातील नागरिकांतून होत आहे.

Corona in Bollywood : करण जोहरच्या पार्टीत कोरोनाचा विस्फोट

चापेकर चौकातून आकुर्डी खंडोबामाळकडे जाणार्‍या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खडी पसरल्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. याठिकाणी अपघाताच्या भितीने वाहने कासवगतीने चालवावी लागतात. त्यामुळे खोदकाम बुजविले पण खडीचे विघ्न कधी दूर होणार हा प्रश्न वाहनचालकांना पडत आहे.

पेन्शनर शिक्षकांच्या प्रश्नांसाठी बैठक घेऊ : आमदार नीलेश लंके

शहरातील विविध भागांमध्ये भूमिगत केबल व पाइपलाइन, गॅसवाहिनी टाकण्यासाठी शहरात अनेक ठिकाणी खोदकाम करण्यात आलेले आहे. मात्र, काम पूर्ण झाल्यानंतरही रस्त्यांची डागडुजी करण्यात आलेली नाही. त्यामुळे तेथे टाकण्यात आलेला मुरुम इतरत्र पसरला आहे. खडी पसरल्यामुळे वेगात आलेल्या दुचाकी चालकांचे अपघात होत आहेत. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी शहरातील खोदलेल्या रस्त्यांची डागडुजी करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.

 

Back to top button