

पिंपरी :
चिंचवड स्टेशन शितळा देवीमाता चौकातून मुंबई-पुणे महामार्गकडे जाणार्या रस्त्यावर वाहनांना प्रवेश बंदी आहे. तरीदेखील वाहनचालक सर्रासपणे नो एंट्रीतून वाहने नेतात. त्यामुळे अनेकदा अपघाताची भीती व्यक्त केली जात आहे.
शहरात वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने वाहतुकीची समस्याही वाढली आहे. वाहने कोठेही उभी केली जात असल्याने अनेक ठिकाणी वाहतूककोंडी होत आहे. तर, अनेकदा वाहनचालक नो एन्ट्रीतून वाहने नेतात. त्यामुळे असे बेदरकार वाहनचालक स्वत:चा व दुसर्याचा जीव धोक्यात घालताना दिसतात.