अमली पदार्थाची तस्करी करणारे त्रिकूट जेरबंद; 23 किलो गांजा, दोन कोयते रोकड जप्त

अमली पदार्थाची तस्करी करणारे त्रिकूट जेरबंद; 23 किलो गांजा, दोन कोयते रोकड जप्त
Published on
Updated on

पुणे : पुढारी वृत्तसेवा

गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकाने शहरातील भारती विद्यापीठ व सिंहगड रोड परिसरात छापा टाकून तिघा गांजातस्करांना अटक केली. त्यांच्याकडून साडेचार लाख रुपये किमतीचा 23 किलो गांजा, दोन कोयते, मोबाईल, रोकड व इलेक्ट्रिक वजन काटा जप्त करण्यात आला आहे.

अमित ऊर्फ बॉब प्रभाकर कुमावत (वय 32, रा. समर्थनगर, हिंगणे), सनी विजय भोसले (वय 24), साई गीता कोताकोंडा (वय 19, दोघे रा. जाधवनगर, वडगाव बुद्रुक, सिंहगड रोड) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी तिघांविरुद्ध भारती विद्यापीठ व सिंहगड रोड पोलिस ठाण्यात अमली पदार्थविरोधी कायद्यानुसार दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

तिघे आरोपी मूळचे अहमदनगर जिल्ह्यातील आहेत. तिघे एकमेकांच्या परिचयाचे आहेत. वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनायक गायकवाड हे भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत गस्तीवर असताना पोलिस कर्मचारी विशाल शिंदे यांना अमित ऊर्फ बॉब हा त्याच्या राहत्या घरातून गांजाची विक्री करीत असल्याची माहिती मिळली.

त्यानुसार पथकाने छापा टाकला असता बॉबच्या घरात 4 लाख 23 हजार रुपये किमतीचा 21 किलो गांजा सापडला तसेच दुसरी कारवाई सिंहगड रोड येथील जाधवनगर परिसरात करण्यात आली. येथील सिद्धेश्वर हॉटेल समोरील रोडवर सनी व साई हे दोघे संशयास्पदरीत्या हालचाल करत असताना गस्तीवरील पथकाला दिसले.

दोघांना ताब्यात घेऊन त्यांची झडती घेतली, त्यावेळी त्यांच्याकडे 31 हजार रुपये किमतीचा गांजा, दोन मोबाईल व रोकड आणि कोयते सापडले. दोघांविरुद्ध सिंहगड रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कामगिरी पोलिस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक पोलिस आयुक्त गजानन टोम्पे, पोलिस निरीक्षक विनायक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी विशाल शिंदे, विशाल दळवी, मारुती पारधी, नितेश जाधव यांच्या पथकाने केली.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news