सोनिया गांधी यांच्यानंतर प्रियांका गांधींही कोरोना पॉझिटिव्ह | पुढारी

सोनिया गांधी यांच्यानंतर प्रियांका गांधींही कोरोना पॉझिटिव्ह

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यानंतर आता प्रियांका गांधी वढेरा यांचीही कोरोना चाचणी (COVID-19) पॉझिटिव्ह आली आहे. त्यांनी स्वतः ट्विट करत याची माहिती दिली आहे. माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून आपल्याला सौम्य स्वरुपाची लक्षणे जाणवत आहेत. मी घरात स्वतःला आयसोलेट केले आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रियांका गांधी यांनी ट्विट करत केले आहे.

सोनिया गांधी यांची काल गुरुवारी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी प्रियांका गांधी यांना कोरोनाची लागण झाली आहे. सोनिया गांधी यांना बुधवारी सायंकाळी हलका ताप आला. त्‍यांची चाचणी करण्‍यात आली. त्‍यांना कोरोनाची लागण झाल्‍याचे स्‍पष्‍ट झाले. मागील आठवड्यात सोनिया गांधी यांच्‍या भेटीला अनेक नेते आणि कार्यकर्ते आले होते. याच काळात त्‍यांना कोरोनाची लागण झाली असावी, असे काँग्रेसचे प्रवक्‍ते सुरजेवाला यांना म्‍हटलं आहे.

सोनिया गांधी यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्‍ह आली आहे. त्‍यांनी स्‍वत:ला आयसोलेट केले आहे. तसेच त्‍यांची भेट घेण्‍यासाठी आलेल्‍या नेते आणि कार्यकर्ते यांनी चाचणी करुन घ्‍यावी, असे आवाहनही त्‍यांनी केले आहे. सोनिया गांधी यांच्‍यावर उपचार सुरु आहेत. दरम्‍यान, ८ जून रोजी सक्‍तवसुली संचालनालय (ईडी) नॅशनल हेरॉल्‍डप्रकरणी सोनिया गांधी यांची चौकशी करणार आहे. या दिवशी त्‍यांना कार्यालयात हजर राहण्‍याचे आदेश देण्‍यात आले आहेत.

Back to top button