शाहू कॉलनीतील शर्मिला चांडक पैठणीच्या विजेत्या

शाहू कॉलनीतील शर्मिला चांडक पैठणीच्या विजेत्या
Published on
Updated on

कोथरूड(पुणे); पुढारी वृत्तसेवा : उखाणे घेताना शब्दांची जुळवाजुळव करताना महिलांची उडालेली धांदल… ज्येष्ठ महिलांसह युवतींनी विविध गीतांच्या तालावर धरलेला ठेका… प्रतिस्पर्धी गटाला मात देण्यासाठी सुरू असलेली धावपळ… तळ्यात-मळ्यात शब्दांच्या गुंत्यात अडकत पत्करावी लागलेली हार अन् मानाच्या पैठणीसाठी शिगेला पोचलेली उत्सुकता… अशा उत्साहपूर्ण व खेळीमेळीच्या वातावरणात 'खेळ गृहलक्ष्मींचा' हा कार्यक्रम रंगला!

अंतिम फेरीत शर्मिला चांडक यांनी बाजी मारत मानाची स्वामिनीची पैठणी जिंकली, तर रेणुका फासाटे या उपविजेत्या ठरल्या. नवरात्रोत्सवानिमित्त दै. 'पुढारी', 'पुढारी न्यूज', कात्रज दूध संघ आणि स्वामिनी पैठणी यांच्या वतीने संयुक्त विद्यमाने कर्वेनगर येथील शाहू कॉलनी येथे महिलांसाठी 'खेळ गृहलक्ष्मींचा' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

अखिल शाहू कॉलनी नवरात्र उत्सव समितीचे संस्थापक शैलेश मेंगडे, अध्यक्ष व माजी नगरसेवक सुशील मेंगडे, उपाध्यक्ष गणेश गायकवाड, अतुल शेडगे, चेतन पांगारे, सुधीर मोहिते, मिलिंद चौधरी, दीपक घोरपडे, सोनाली मेंगडे, शीतल मेंगडे, रंजना बईकर, निर्मला येवले, ज्योती जगताप, 'कात्रज डेअरी'चे वरिष्ठ व्यवस्थापक महेश जाधव, मार्केटिंग अधिकारी पांडुरंग कोंढाळकर आदीसह महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 'कात्रज दूध'चे वरिष्ठ व्यवस्थापक कुमार मारणे यांनी खुमासदार सूत्रसंचालन केले.

दै. 'पुढारी'ने घेतलेल्या कार्यक्रमामुळे कॉलनीत नवचैतन्य निर्माण झाले. चिमुकले, ज्येष्ठ नागरिक व महिलांनी यात उत्साहाने सहभाग घेतला. या कार्यक्रमासाठी आमच्या कॉलनीची निवड केल्याबद्दल दै. 'पुढारी', 'पुढारी न्यूज'चे विशेष आभार! दै. 'पुढारी' हे आमचे आवडीचे वृत्तपत्र आहे. तसेच जनतेचा आवाज ठरलेल्या 'पुढारी न्यूज' चॅनेलला भरभरून शुभेच्छा!

– शैलेश मेंगडे, संस्थापक, अखिल शाहू कॉलनी नवरात्र उत्सव समिती

घरसंसाराचा गाडा ओढताना नेहमीच धावपळ करणार्‍या महिलांनी या कार्यक्रमाचा पुरेपूर आनंद घेतला. मुळात आपल्या संस्कृतीचे जतन करणे ही सर्वांची जबाबदारी आहे. अशा उपक्रमांतून भावी पिढीला आपल्या संस्कृतीची माहिती होते. दै. 'पुढारी', 'पुढारी न्यूज' व कात्रज दूध संघाने आयोजित केलेला हा कार्यक्रम अतिशय मनोरंजक ठरला.

-शशिकला मेंगडे,
अध्यक्ष, शाहू कॉलनी कल्चरल कमिटी व माजी नगरसेविका

या कार्यक्रमात सर्वांनी धमाल केली. यात सादर करण्यात आलेल्या खेळांचा महिलांनी पुरेपूर आनंद लुटला. या उपक्रमामुळे दैनंदिन कामाचा थकवाच गेला. मला पैठणी मिळाली याचा आनंद झाला आहे. या कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल दै. 'पुढारी'चे आभार!

-शर्मिला चांडक,
पैठणीच्या मानकरी

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news