

Pune Zilla Parishad Election 2026 Wafgaon Retwadi News
राजगुरुनगर: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या वाफगाव - रेटवडी जिल्हा परिषद गटात रविवारी (दि १) आयोजित करण्यात आलेल्या शोक सभांना मोठी गर्दी झाली. गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार अश्विनीताई राजेंद्र पाचारणे समर्थकांनी या शोकसभांचे आयोजन केले होते. माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या या सभांमध्ये गावोगावच्या कार्यकर्त्यांनी, मतदारांनी सहभाग घेऊन आपल्या लाडक्या नेत्याला साश्रूनयनानी श्रद्धांजली वाहिली. जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या ऐन निवडणुकीत अजित पवारांच्या जाण्यामुळे या गटातील उमेदवारांनी गाजावाजा होणारा प्रचार थांबवला आहे. मात्र गटातील गावोगावच्या मतदारांच्या आग्रहाखातर शोकसभांचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी मार्गदर्शन करताना माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी पक्षाच्या उमेदवारांना निवडून देणे हीच अजित पवार यांना खरी श्रद्धांजली ठरेल असे सांगितले. जिल्हा परिषदेच्या उमेदवार अश्विनीताई पाचारणे यांनी अजित पवारांच्या आठवणीं सांगत दादांच्या विचारांना साथ देण्याचे भावनिक आवाहन केले. पंचायत समितीचे उमेदवार अजय चव्हाण वाफगाव गणात तर प्रा. बापू चौधरी हे रेटवडी गणातील शोक सभांना उपस्थित होते.
पंचायत समितीचे माजी सदस्य द्वारकानाथ टिजगे , रेटवडीगावात झालेल्या शोक सभेसाठी गावच्या सरपंच निलमताई हिंगे, राष्ट्रवादीचे युवक उपाध्यक्ष व ग्रामपंचायत सदस्य किरण पवार , सदस्य मारुती पवळे , सोसायटी अध्यक्ष रामकृष्ण वाबळे , निवृत्त कृषी अधिकारी पंडितराव वाबळे ,माजी उपसरपंच शिवाजी पवळे ,माजी तंटामुक्ती अध्यक्ष मंगेश वाबळे , वसंतराव रेटवडे , सुनील वाबळे, संपत वाबळे ,ज्ञानेश्वर पवार , साहेबराव टिजगे , प्रवीण बोऱ्हाडे , दिपक काळे ,अविनाश पवळे , गोवर्धन पवळे , सुभाष पवार ,अमोल वाबळे ,मंगेश पवार , नयन खंडागळे , व इतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वाफगाव येथे झालेल्या शोकसभेला सरपंच नितीन लंगोटे, माजी सरपंच अजय भागवत, शरद थिटे, रज्जाक इनामदार, अमोल कराळे, भैय्यासाहेब कराळे, संतोष सुर्वे आदी उपस्थित होते.वरुडे गावच्या लोकनियुक्त सरपंच सुनिता पडवळ,निलेश तांबे , सदस्य पांडुरंग वाघोले, सामाजिक कार्यकर्ते हिरामण तांबे , आरोग्य दूत हनुमंत तांबे, रामभाऊ तांबे, सोसायटीचे माजी अध्यक्ष सचिन वाघोले, मोहन तांबे, राम पाटील तांबे, मयूर तांबे, ग्रामपंचायत सदस्य रुपेश तांबे, माजी उपसरपंच निशांत तांबे, सामाजिक कार्यकर्ते भीमराज मंडले, भालचंद्र रोडे, संदेश तांबे, संतोष तांबे, मारुती पोखरकर, श्रेयस सावळे, प्रज्वल गोडसे, पत्रकार काळूराम गोडसे व ग्रामस्थ उपस्थित होते.
गोसासी मध्ये माजी सरपंच अप्पासाहेब गोरडे, गोविंद गोरडे, बाबाजी गोरडे , सुदाम गोरडे, संदीप गोगावले,लक्ष्मण गोरडे, अभिषेक गोरडे, पोपट काशीद व गावातील युवकांनी शोकसभेचे आयोजन केले. येथे झालेल्या सभेत गावातील महिला, युवक मतदार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
श्री क्षेत्र गुळाणी येथे माजी सरपंच दिलीप ढेरंगे, बाबाजी पिंगळे, सुनील तांबे पाटील, राममहाराज रोडे, किसन ढेरंगे, अर्जुन रोडे, गुलाब ढेरंगे, माणिक पिंगळे व इतर जबाबदार कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते. सर्व सभांचे निवेदन पूजाताई थिगळे यांनी केले.