Dombivli Family Murder Case: साडेबारा वर्षांनंतर अखेर न्याय : पत्नी व चार मुलांवर हल्ला करणाऱ्या पित्याला जन्मठेप

डोंबिवलीतील रामबाग परिसर हादरवणाऱ्या घटनेत नऊ वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू; कल्याण सत्र न्यायालयाचा निर्णायक निकाल
Friend murder case
खूनप्रकरणी आरोपीस जन्मठेपFile Photo
Published on
Updated on

डोंबिवली : कल्याण पश्चिमेकडे असलेल्या रामबाग गल्ली क्रमांक चारमध्ये स्वानंंद कॉलनीत पाताडे कुटुंब राहते. साडेबारा वर्षांपूर्वी मध्यरात्रीच्या सुमारास याच स्वानंंद कॉलनीमध्ये काळजाचा ठोका चुकविणारी घटना घडली होती. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन रागाच्या भरात पत्नी आणि झोपेत असलेल्या चार मुलांवर धारदार पात्याने हल्ला चढवून माथेफिरूने त्यांना गंभीर जखमी केले होते. या हल्ल्यात नऊ वर्षाचा प्रणव उर्फ देवेश सुनील पाताडे (9) या मुलाचा जागीच मृत्यू झाला होता. पत्नी मीनासह तिच्या प्रणव उर्फ देवेश (9), सुजित, शुभम (5) आणि सर्वेश (अडीच वर्ष) या तिन्ही मुलांना गंभीर जखमी केले होते. या खटल्याचा निकाल जाहीर करताना कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधिश एस. एस. इनामदार यांनी मारेकरी सुनील सदाशिव पाताडे (46) याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

Friend murder case
Union Budget 2026: कोकणासाठी विकासाचा महासंकल्प; कृषी-मत्स्य-रेल्वे-बंदरांना ऐतिहासिक चालना

न्यायालयाने सुनील पाताडे याला पाच हजार रूपये दंड ठोठावला आहे. दंड न भरल्यास तीन महिने कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. मार्च 2013 रोजी खुनाची घटना घडली होती. साडेबारा वर्षानंतर या खटल्याचा निकाल लागला आहे.

Friend murder case
Urun transport problems : उरण आगाराने एसटी गाड्यांची संख्या वाढवावी

या संदर्भात हल्ल्यातून बचावलेल्या आणि गंभीर जखमी झालेल्या पत्नी मीना पाताडे हिच्या जबानीवरून महात्मा फुले चौक पोलिसांनी गुन्हा दाखल होता. वरिष्ठ पोलिस निरीक्षक बळीरामसिंग परदेशी, पोलिस निरीक्षक विजय नाईक आणि त्यांचे सहकारी सोपान नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक एस. के. धनवडे यांनी तपास करून कल्याण जिल्हा न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. पोलिसांनी या प्रकरणी आरोपी सुनील पाताडे याला अटक केली होती. या खटल्यात सरकार पक्षातर्फे सरकारी वकील ॲड. संजय गोसावी, ॲड. जयश्री भटेजा, तर आरोपीतर्फे टी. ए. देवरे यांनी काम पाहिले. न्यायालय आणि पोलिस ठाण्याचे समन्वयक म्हणून पोलिस उपनिरीक्षक आर. डी. आटपाटकर, हवालदार संंजय शेलार, भालचंद्र पवार आणि जयश्री झोळेकर यांनी काम पाहिले.

Friend murder case
Biodiversity of Tala : तळ्यातील रस्त्याच्या कडेला, जंगल भागात बहरला ‌‘पळस‌’

ठोस साक्षी, पुराव्यांमुळे खडीफोड

न्यायालयात आरोपपत्र दाखल झाल्यानंतर सरकारी वकील ॲड. संजय गोसावी यांनी या गुन्ह्यातील सबळ पुरावे न्यायालयासमोर सादर करून आरोपी सुनील या घटनेला प्रत्यक्ष कसा जबाबदार आहे हे न्यायालयाला साक्षी/पुराव्याने पटवून दिले. आरोपीच्या वकिलांनी या गुन्ह्यात प्रत्यक्ष साक्षीदार नसल्याचे, तसेच साक्षीत आणि घटनेत सातत्य नसल्याचे सांगून सरकार पक्षाचे म्हणणे खोडून काढण्याचा प्रयत्न केला. न्यायालयाने या घटनेचा पंचनामा, साक्षीदार आणि एकूण घटनाक्रम आणि सबळ पुराव्यांच्या आधारे या खटल्यातील सुनील पाताडे हाच जबाबदार असल्याचा ठपका ठेवत त्याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news