Mumbai Coastal Road: मुंबई कोस्टल रोडवर सहा ठिकाणी अत्याधुनिक बायो-टॉयलेट्स कार्यान्वित

महिला, पुरुष, बालक व दिव्यांगांसाठी सौरऊर्जेवर चालणाऱ्या शौचालयांची सुविधा; शुल्क फक्त 5 रुपये
Mumbai Coastal Road
Mumbai Coastal RoadPudhari
Published on
Updated on

मुंबई : धर्मवीर, स्वराज्यरक्षक, छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्त्यावर (दक्षिण) सहा ठिकाणी बृहन्मुंबई महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून अत्याधुनिक प्रकारच्या जैव विघटनक्षम शौचालयांची (बायो-टॉयलेट्स) उभारणी करण्यात आली आहे. किनारी रस्त्यावरील (कोस्टल रोड) विहार क्षेत्रावर पादचारी भुयारी मार्ग (पीयूपी) क्रमांक 2, 4, 6, 11, 12 व 14 या ठिकाणी सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. याकरिता महिला व पुरुषांसाठी प्रत्येकी 5 रुपये इतके नाममात्र शुल्क आकारले जाणार आहे.

Mumbai Coastal Road
Non-Teaching Staff: शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा राज्यस्तरीय अधिवेशन; मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास आंदोलनाचा इशारा

या मार्गावर ठिकठिकाणी विहार क्षेत्र निर्माण करण्यात आले आहे. समुद्रकिनारी उभारलेल्या या विहारक्षेत्रावर मोठ्या प्रमाणात नागरिक, पर्यटक येतात. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून जैव विघटनक्षम शौचालये (बायो-टॉयलेट्स) उपलब्ध करून देण्यात आली आहेत. यात मुंबई किनारी रस्ता (दक्षिण) विहार क्षेत्रावरील पादचारी भुयारी मार्ग (पीयूपी) क्र. 2, अमरसन्स उद्यानाजवळ, पादचारी भुयारी मार्ग (पीयूपी) क्र. 4,

Mumbai Coastal Road
Amol Mitkari |"भविष्यात त्यांच्या घरात त्यांची चिता जाळणारा कुणी शिल्लक नसेल" : अमोल मिटकरींची खळबळजनक पोस्‍ट

आकृती इमारत वाहनतळाजवळ, पादचारी भुयारी मार्ग (पीयूपी) क्र. 6, हाजी अली जंक्शन, पादचारी भुयारी मार्ग (पीयूपी) क्र. 11, वरळी दुग्धशाळेसमोर, पादचारी भुयारी मार्ग (पीयूपी) क्र. 12, बिंदूमाधव ठाकरे चौकाजवळ, पादचारी भुयारी मार्ग (पीयूपी) क्र. 14, खान अब्दुल गफार खान मार्गावर बिंदूमाधव ठाकरे चौकाच्या उत्तर दिशेला, अशा एकूण सहा ठिकाणी या सुविधा आहेत.

Mumbai Coastal Road
Sanjay Raut | अजित पवारांची होती मूळ प्रवाहात परत येण्याची धडपड : राष्ट्रवादीच्या विलनीकरणावर संजय राऊत नेमकं काय म्हणाले?

या अत्याधुनिक मॉड्युलर जैव विघटनक्षम शौचालयाचा आकार 20 बाय 20 बाय 8 फूट असून 1 केडब्ल्यू सौरऊर्जा प्रणालीवर कार्यरत राहील. यामध्ये महिलांसाठी 2 (1 पाश्चिमात्य आणि 1 भारतीय शैलीचे), पुरुषांसाठी 2, बालकांसाठी 1 आणि दिव्यांगांसाठी 1 पाश्चिमात्य शैलीचे शौचालय आहे. तर, 6 युरिनल, 3 वॉशबेसिन, 3 सेन्सर आधारित आरसे, 3 साबण डिस्पेन्सर, 1 सॅनिटरी पॅड इन्सिनरेटर, 1 सॅनिटरी पॅड व्हेंडिंग मशीन, 1 हजार लीटर क्षमतेची पाण्याची टाकी, 3 हजार लीटर क्षमतेचे 1 डीआरडीओ बायो-डायजेस्टर आदी सुविधांचाही यात समावेश आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news