Valhe ST Bus Flyover Issue: वाल्हे ग्रामस्थांनी उड्डाणपुलावरून जाणाऱ्या एसटी बस रोखल्या

अधिकृत बसथांब्याअभावी प्रवाशांची गैरसोय; सुरक्षिततेसाठी ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा
Valhe Flyover Issue
Valhe Flyover IssuePudhari
Published on
Updated on

वाल्हे: पुणे-पंढरपूर पालखी महामार्गाच्या विस्तारीकरणानंतर वाल्हे (ता. पुरंदर) परिसरातील प्रवाशांचे हाल अधिकच वाढले आहेत. वाल्हे-पुणे किंवा निरा दिशेने प्रवास करण्यासाठी सध्या कुठेही अधिकृत बसस्थानक व एसटी बसथांबा उपलब्ध नाही. वाल्हे ग््राामपंचायतीने मागील महिन्यात सासवड आगाराला निवेदन दिल्यानंतर काही दिवस महामार्गावरील पुलावर एक कर्मचारी उभा करून बसगाड्या पुलाखाली सेवारस्त्याला थांबविण्याची व्यवस्था केली होती. सध्या काही गाड्या पुलाखालून मार्गस्थ होतात, तर अनेक गाड्या पुलावरून जातात. त्यामुळे नेमके कुठे उभे राहायचे? हेच प्रवाशांना कळेनासे झाले आहे.

Valhe Flyover Issue
SPPU PRN block issue: पीआरएन ब्लॉक विद्यार्थ्यांचा तिढा सुटला; पुणे विद्यापीठाचा मोठा निर्णय

बस नेमकी पुलावर थांबणार की पुलाखाली? असा प्रश्न प्रवाशांना दररोज पडत आहे. शनिवारी (दि.13) उपसरपंच सागर भुजबळ तसेच इतर ग््राामस्थांनी पुलावर थांबून पुलावरून जात असलेल्या एसटी बस पुलाखालून नेण्याची विनंती केल्यानंतर, ताटकळत थांबवेल्या प्रवाशांचा प्रवास सुखकर झाला. वाल्हे येथील प्रवासीवर्गाची दररोज होणारी हेळसांड तात्पुरती टळली असली तरी यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी ग््राामस्थांनी केली आहे.

Valhe Flyover Issue
Unlicensed Sugarcane Crushing: विनापरवाना ऊस गाळपाचा फटका; साताऱ्यातील तीन साखर कारखान्यांवर ५२.७४ लाखांचा दंड

एसटी महामंडळाकडे वारंवार सांगूनही उपाययोजना होत नसल्याने वाल्हे ग््राामस्थांनी शनिवारी पालखी महामार्गावरील उड्डाणपुलावरून जाणाऱ्या एसटी बस अडवून त्या सेवा रस्त्याने वळविल्या. एसटी बसेस उड्डाणपुलावरून जात असताना प्रवासी, तसेच शाळा-कॉलेजचे विद्यार्थी पुलाच्या खाली उभे राहतात. पुलावर उभे राहणे अथवा रस्ता ओलांडणे अत्यंत धोकादायक आहे. यामुळे अपघाताची शक्यता आहे. या बाबीकडे वारंवार लक्ष वेधूनही एसटी प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप ग््राामस्थांकडून होत आहे. या वेळी उपसरपंच सागर भुजबळ, सत्यवान सूर्यवंशी, शांताराम दुर्गाडे, प्रशांत देशमुख, पोपट पवार, आकाश भुजबळ, स्वप्नील भुजबळ, नागेश दुर्गाडे, दादा भुजबळ आदींसह ग््राामस्थ उपस्थित होते.

Valhe Flyover Issue
Criminal Arrested Pune: तीन वर्षांपासून फरार सराईत आरोपी अखेर गजाआड; बंडगार्डन पोलिसांची शिताफीनं कारवाई

ग््राामस्थांच्या मागणीनुसार सासवड व बारामती डेपोच्या बसगाड्या पुलाखालूनच सेवारस्त्याने मार्गस्थ होतात. निरा येथून येणाऱ्या इतर डेपोच्या गाड्यांसाठीही निरा बसस्थानकात बस पुलाखालून नेण्याबाबत शिक्का मारला जातो. प्रवाशांची गैरसोय होणार नाही, याची दखल घेतली जात आहे. वाल्हेकर ग््राामस्थांनी स्वतःच पुलावर थांबून, एसटी बसचालकांना पुलाखालून बस घेऊन जाण्याची विनंती केली आहे. यासंदर्भात ग््राामस्थांनी संपर्क साधला आहे. यापुढे असे एसटी बसचालक आढळून आल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल.

सागर गाडे, सासवड आगार व्यवस्थापक.

Valhe Flyover Issue
PMPML Breath Analyzer: पीएमपी चालकांची ड्युटीपूर्वी ब्रेथ ॲनालायझर तपासणी; प्रवासी सुरक्षेला कडक कवच

नागरिकांच्या सुरक्षिततेशी तडजोड करणारी ही मनमानी आता सहन केली जाणार नाही.

सागर भुजबळ, उपसरपंच, वाल्हे

पुलावरून जाणार्‌‍या एसटी बस पुन्हा आढळल्यास तीव आंदोलन छेडले जाईल.

सत्यवान सूर्यवंशी

सकाळी कॉलेजला जायची घाई असते. मात्र, बस कुठे थांबते? याचा काही नेम नसल्याने रोज उशीर होतो. उन्हात तासन्तास उभं राहावं लागतं. विद्यार्थ्यांसाठी तरी योग्य बसथांबा लवकरात लवकर करावा.

अदिती भुजबळ, विद्यार्थिनी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news