पुणे जिल्ह्याने मारली बाजी; पहिला डोस शंभर टक्के

पुणे जिल्ह्याने मारली बाजी; पहिला डोस शंभर टक्के

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पुणे जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा पहिला डोस शंभर टक्के पूर्ण झाला आहे. बुधवारी (दि. 8) दुपारी बारा वाजता शंभर टक्क्यांचा टप्पा पूर्ण झाला असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले. तर दुसरा डोस 65.7 टक्के एवढा झाल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

पुणे जिल्हा राज्यामध्ये लसीकरणामध्ये दुसर्‍या क्रमांकावर आहे. जिल्ह्यामध्ये 83 लाख 42 हजार नागरिक लसीकरणासाठी पात्र आहेत. कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस आत्तापर्यंत 83 लाख 61 हजार 284 नागरिकांनी घेतला आहे. तर दुसरा डोस 55 हजार 14 हजार 834 नागरिकांनी घेतला आहे.

दरम्यान, ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर तातडीने पहिला डोस पूर्ण करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी वारंवार सूचना केल्यानंतर लांबलेला पहिला डोस अखेर बुधवारी शंभर टक्के पूर्ण झाला आहे. जिल्हाधिकार्‍यांनी निर्धारित केलेल्या वेळेपेक्षा आठ दिवस उशिराने हे उद्दिष्ट जिल्हा आरोग्य विभागाला पूर्ण करता आले आहे.

दक्षिण अफ्रिकेत फैलाव सुरू झालेल्या ओमायक्रॉनचे रुग्ण पुण्यात देखील आढळले. त्या पार्श्वभूमीवर पहिला डोस शंभर टक्के झाल्याची बाब काहीशी दिलासा देणारी आहे. यापूर्वी पुणे शहराने पहिला डोस शंभर टक्के पूर्ण केलेला होता, आता ग्रामीणसह पुणे, पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण भागात पहिला डोस शंभर टक्के पूर्ण झाला आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news