सिरम चे कार्यकारी संचालक डॉ. सुरेश जाधव यांचे निधन | पुढारी

सिरम चे कार्यकारी संचालक डॉ. सुरेश जाधव यांचे निधन

पुणे : पुढारी वृत्तसेवा : सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे कार्यकारी संचालक व कॉविशिल्ड लस निर्मितीत महत्त्वाचे योगदान देणारे शास्त्रज्ञ डॉ. सुरेश जाधव यांचे बुधवारी पुण्यात निधन झाले.

डॉ. सुरेश जाधव हे काही दिवसांपासून आजारी होते. त्यामुळे त्याना पुण्यातील एक खासगी रुग्णयलायत दाखल करण्यात आले होते. ते मूळचे विदर्भातले. एका छोट्या गावातून येऊन त्यांनी संपूर्ण जगात आपल्या संशोधनाने वेगळा ठसा उमटवला. त्यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण नागपूर विद्यापीठात झाले. विविध प्रकारच्या लस निर्मितीत त्यांनी ४० वर्षे महत्त्वाचे योगदान दिल्याने संपूर्ण जगातील वैद्यकीय क्षेत्रात त्यांचा दबदबा होता.

बिग ब्रेकिंग : बिपीन रावत यांच्या Mi-17V5 हेलिकॉप्टरला अपघात; चौघांचे मृतदेह मिळाले

संपूर्ण भारतातच नव्हे तर जगभरातील वैद्यकीय क्षेत्रातील शास्त्रज्ञ डॉ. जाधव यांना ओळखतात. पुण्याच्या सीरम मध्ये आल्यानंतर त्यांनी विविध प्रकारच्या लस निर्मितीत महत्वाचे योगदान दिले.सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या वतीने कोविशिल्ड लसीची निर्मिती सुरू झाली, त्यात अतिशय महत्वाचे योगदान डॉ. जाधव राहिले. दिवस-रात्र एक करत त्यांनी या लस निर्मितीत मोलाचा वाटा दिला.

पुणे : पोटचारीला धडकून कार खाली कोसळली; पुण्यातील ५ जण गंभीर जखमी

त्यांच्या निधनाने केवळ भारताचेच नव्हे तर जगभरातील वैद्यकीय क्षेत्राचे मोठे नुकसान झाल्याची भावना देश विदेशातील क्षेत्रातील दिग्गज शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे

हेही वाचा

डॉ. आ. ह. साळुंखे यांना साने गुरुजी वाचनालयाचा दाभोलकर पुरस्कार

पुण्यातील प्रभागरचनेत राष्ट्रवादीला धोबीपछाड!

पुणे : सारोळा येथे घुसले तीन रानगवे; बघ्यांच्या गर्दीमुळे झाले सैरभैर

राज्यात पहिला डोस पूर्णत्वाच्या दिशेने

Anti BJP front : विरोधकांच्या आघाडीचे राहुल गांधी यांनी नेतृत्व करावे : संजय राऊत

Tomato Price : देशभरात टोमॅटो दराचा भडका, प्रति किलो १२० रुपयांवर!

 

Back to top button