पुणे : खराडीत बीआरटी स्टॉपला कारची धडक : दोन ठार; दोन जखमी

अपघातग्रस्त कार
अपघातग्रस्त कार
Published on
Updated on

येरवडा : पुढारी वृत्तसेवा : भरधाव वेगाने निघालेली ब्रिजा कार (एमएच १२, क्यू एफ ९६६३ल) खराडी बायपास येथील बीआरटी बस थांब्याला धडकल्याने झालेल्या भीषण अपघातात दोन जण जागीच ठार झाले, तर दोन गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात बुधवारी रात्री साडे बाराच्या सुमारास झाला.

वाघोली च्या दिशेने भरधाव निघालेली ही कार बीआरटी थांब्याला एवढ्या जोरात धडकली की, कारच्या पुढच्या बाजूचा चुराडा झाला आहे. कारमध्ये चौघेजण होते. त्यापैकी कार चालक संकेत रामचंद्र भुजबळ (वय २२, रा. साइनगरी, चंदननगर) व ओम राहुल पवळे वय १७, रा. किनारा हौसिंग सोसायटी, कसबा पेठ) या दोघांचा जागीच मृत्यू झाला. गौरव संजय साठे (वय 22, संभाजी नगर, वाघोली) व प्रफुल्ल अंकमंची (वय २१, रा. बिडी कामगार नगर चंदननगर, खराडी.) हे दोघे जखमी आहेत.

सहाय्यक पोलीस फौजदार नामदेव सुपे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. चालकासह कारमधील इतर सर्व मद्यधुंद अवस्थेत होते आणि चालकाचे कारवरील नियंत्रण सुटून हा अपघात झाल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव यांनी दिली

संकेत भुजबळ
संकेत भुजबळ
ओम पवळे
ओम पवळे

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news