दिल्लीच्या रोहिणी कोर्टात स्फोट; स्कूलबॅगमधील लॅपटॉपसदृश वस्तूने घेतला पेट | पुढारी

दिल्लीच्या रोहिणी कोर्टात स्फोट; स्कूलबॅगमधील लॅपटॉपसदृश वस्तूने घेतला पेट

नवी दिल्ली, पुढारी ऑनलाईन : राजधानी दिल्लीतील रोहिणी कोर्टात गुरुवारी सकाळी १०२ नंबरच्या कोर्टात जोरदार स्फोट झाला. काही दिवसांपूर्वी या कोर्टात गँगवॉर झाले होते.

गुरुवारी सकाळी एका स्कूलबॅगमधून आणलेल्या लॅपटॉपसदृश वस्तूने पेट घेतला आणि मोठा आवाज झाला. या स्फोटाचा मोठा आवाज झाल्याने घबराट पसरली. यात कुणीही जखमी झाले नाही, मात्र घबराट उडाली.

रोहिणी कोर्टात स्फोट झाल्यावर मोठा आवाज झाल्याने एकच धावपळ उडाली. त्यानंतर प्राथमिक माहितीनुसार लॅपटॉपच्या बॅटरीचा स्फोट झाल्याचे लक्षात आले. स्फोटानंतर लगेचच एक पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. स्फोटानंतर हा परिसर रिकामी करण्यात आला असून पोलिस चौकशी करत आहेत.

२४ सप्टेंबर रोजी उच्च सुरक्षाव्यवस्थेने सुसज्जित रोहिणी न्यायालय टोळीयुद्धातून झालेल्या गोळीबाराने हादरले होते. या घटनेत एका कुख्यात गुंडाची हत्या झाली होती. सुरक्षारक्षकांना त्याच्या मारेकऱ्यांचा खात्मा केला होता.

भर दुपारी न्यायालयात फिल्मी स्टाईलने रंगलेल्या या थरार नाट्यानंतर मात्र पोलीस सुरक्षाव्यवस्थेवर गंभीर सवाल उपस्थित केले जात होते. पोलिसांच्या ताब्यात असलेला कुख्यात गुंड जितेंद्र मान उर्फ गोगीची हत्या करण्यासाठी मारेकरी वकिलांचा पेहराव करीत न्यायालय परिसरात घुसले होते. टिल्लू ताजपुरिया टोळीने वकिलांचा पेहराव करून गोगीवर हल्ला केला.

हेही वाचा : 

Back to top button