सह्याद्री स्कूलमध्ये बारा जातींचे टोमॅटो!

सह्याद्री स्कूलमध्ये बारा जातींचे टोमॅटो!

पुणे; पुढारी वृत्तसेवा : खेड तालुक्यातील सह्याद्री स्कूल येथील टोमॅटोची चर्चा वाढीव भावामुळे नव्हे, तर टोमॅटोच्या तब्बल बारा विविध प्रकारांमुळे सुरू आहे. पेर, पिवळा, काळा, चॉकलेट, चेरी, काशी, बल्ब असे एक नाही, तर तब्बल 12 विविध प्रकारचे टोमॅटो येथे पाहायला मिळतात. गेल्या काही दिवसांपासून बाजारामध्ये टोमॅटोचा तुटवडा निर्माण झाल्याने भावात मोठी वाढ झाली आहे. दोन महिन्यांपूर्वी भाव नसल्याने टोमॅटोच्या पिकात जनावरे सोडण्याची वेळ शेतकर्‍यांवर आली होती. आता भाव वाढल्याने टोमॅटोचे चोरांपासून रक्षण करण्यासाठी पोलिस संरक्षणासह इतर प्रतिबंधात्मक उपाय करण्याची वेळ शेतकर्‍यांवर आली आहे. जुन्नर, आंबेगाव आणि खेड तालुका टोमॅटोचे उत्पन्न घेण्यात आघाडीवर आहे. याच खेड तालुक्यातील सह्याद्री स्कूलमध्ये तब्बल 12 विविध प्रकारच्या टोमॅटोच्या जातींची लागवड करण्यात आली आहे.

चासकमान धरणाच्या कुशीत वसलेल्या सह्याद्री स्कूलने स्थानिक, पूर्वापार चालत आलेल्या पारंपरिक व देशी वाणांचा स्थानिक शेतकर्‍यांमध्ये प्रचार आणि प्रसार करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. कृष्णमूर्ती फाउंडेशनच्या सह्याद्री स्कूलच्या वतीने शिक्षण क्षेत्रासोबतच नैसर्गकि शेतीचेदेखील काम केले जाते. सह्याद्री स्कूल देशी बियाणे संवर्धक व समन्वयक दीपा मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या अनेक वर्षांपासून येथे नैसर्गकि शेती केली जाते. तब्बल 65 एकर परिसरात ही निवासी शाळा आहे. येथे शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना पौष्टिक, शुध्द व विषमुक्त अन्न मिळावे म्हणून शाळेच्या परिसरातच मोठ्या प्रमाणात नैसर्गकि शेतीचे अनेक प्रयोग केले जातात.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news