पुणे : तिकिटांच्या मशिन अद्यापही ‘यार्डात’च पडून

रेल्वेच्या पुणे स्थानकावर धूळ खात पडलेली तिकिटाची एटीव्हीएम.
रेल्वेच्या पुणे स्थानकावर धूळ खात पडलेली तिकिटाची एटीव्हीएम.
Published on
Updated on

प्रसाद जगताप

पुणे : रेल्वेचे तिकीट काढण्यासाठी उपयोगात येणार्‍या लाखो रुपयांच्या एटीव्हीएम (अ‍ॅटोमॅटिक तिकीट व्हेंडिंग मशिन) पुणे रेल्वे स्थानकांवर धूळ खात पडल्या आहेत. रेल्वे प्रशासनाचे मात्र याकडे सर्रास दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे.

रेल्वे स्थानकावरील तिकीट खिडक्यांवर होणारी गर्दी लक्षात घेता, रेल्वे प्रशासनाने काही वर्षांपूर्वी ही लाखो रुपयांची एटीव्हीएम खरेदी केली. सुरुवातीला 'नव्याचे नऊ दिवस' याचा वापर झाला. मात्र, त्यानंतर पुणे रेल्वे स्थानकावरील या सुमारे 20 ते 25 मशिन आता एका कोपर्‍यात धूळ खात पडल्या आहेत. परिणामी रेल्वे स्थानकाच्या खिडक्यांवर प्रवाशांची गर्दी वाढत आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने पुन्हा ही तिकीट मशिन सुरू करावीत, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.

रेल्वे प्रशासन प्रवाशांच्या सोयीसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या वस्तूंकडे कायमच दुर्लक्ष करते. बॅटरीच्या गाड्यादेखील अनेक दिवसांपासून बंद पडल्या होत्या. आता ही मशिन धूळ खात पडली आहे. प्रशासनाने या मशिन तत्काळ प्रवाशांसाठी सुरू कराव्यात.

– हर्षा शहा, अध्यक्ष, रेल्वे प्रवासी ग्रुप

कोरोना काळात जनरल तिकीट बंद झाल्यामुळे हे एटीव्हीएम बंद करण्यात आले. अजूनही काही गाड्यांमध्ये जनरल तिकीट सुरू करण्यात आलेले नाही. त्यामुळे या मशिन बंद आहेत. त्या सुरू करण्यासाठी मुख्यालयाशी पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे. मुख्यालयाची परवानगी मिळाल्यास तत्काळ या मशिन सुरू करण्यात येतील.

– मनोज झंवर, जनसंपर्क अधिकारी, रेल्वे, पुणे विभाग

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news