Pune Crime News : दुचाकीवरील चोरट्यांनी दागिने हिसकाविले

Pune Crime News : दुचाकीवरील चोरट्यांनी दागिने हिसकाविले
Published on
Updated on

भोर : पुढारी वृत्तसेवा : भोर-मांढरदेवी रस्त्यावर नंबरप्लेट नसलेल्या हिरव्या रंगाच्या बुलेटवरून आलेल्या दोन चोरट्यांनी तीन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून पोबारा केला. यात एक महिला जखमी झाली. चोरटे भोरच्या चौपाटी परिसरातून फिरून महाडच्या दिशेने गेले आणि पुन्हा विसगाव खोर्‍यातील रस्त्यावरून पळून गेले. मंगळवारी (दि. 19) सकाळी घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांत घबराट पसरली. भोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी 9 च्या सुमारास भोरहून तौसिफ शेख हे पत्नी हीनासोबत दुचाकी (एमएच 11 सीसी 2267) वरून वाईकडे निघाले होते.

संबंधित बातम्या :

भोर-मांढरदेव रस्त्यावरील अंबाडखिंड घाट सुरू झाल्यानंतर खाणीशेजारी पाठीमागून बुलेटवरून आलेल्या दोघांनी त्यांना ओव्हरटेक करीत हीना शेख यांच्या हातातील पर्स आणि गळ्यातील सोन्याचे मनी असलेली चेन खेचली. पर्समध्ये तीन हजार रुपयांसह बँकेचे पासबुक व दाखले होते. काही मिनिंटांतच बुलेट यू टर्न घेऊन परत आली आणि शेख दाम्पत्यांना चिडवत भोरच्या बाजूला जोरात निघून गेली. सुवर्णा तानाजी माने या मुलगा आकाश याच्यासोबत पुण्याहून मांढरदेवीच्या दर्शनाला दुचाकी (एमएच 12 एसजी 7308) वरून निघाले होते.

अंबाडखिंड घाटाकडे जाण्यासाठीच्या वळणावर समोरून बुलेटवर आलेल्यांनी त्यांच्या दुचाकीसमोर बुलेट थांबवली. काही समजायच्या आत त्यांनी पर्स हिसकावली. त्यात 5 हजार रुपये, आधार कार्ड व एटीम होते.नेरे गावाजवळ वरोडी येथील आनंदा शंकर तुपे हे पत्नी वनिता व मुलगा दुचाकी (एमएच 12 झेडए 4034) वरून भोरला निघाले होते. चोरट्यांनी त्यांच्या दुचाकीला पाठीमागून धडक देत वनिता तुपे यांच्या पर्स व मणिमंगळसूत्र हिसकावले. त्या वेळी वनिता खाली पडल्या आणि त्यांच्या पायाला व हाताला दुखापत झाली.

आनंदा तुपे यांनी फोन करून चोरट्यांची बुलेट भोरच्या बाजूला आल्याचे सांगितले. तरुणांनी चौपाटी परिसरात बुलेट थांबविण्याचा प्रयत्न केला. परंतु, बुलेट महाडच्या बाजूला जोरात निघून गेली. पोलिसांनीही त्यांचा पाठलाग केला. परंतु, ते सापडले नाहीत. पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत जाधव तपास करीत आहेत.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news