शिरसाई योजनेचे पाणी पूर्ण क्षमतेने मिळणार

शिरसाई योजनेचे पाणी पूर्ण क्षमतेने मिळणार
Published on: 
Updated on: 

उंडवडी : पुढारी वृत्तसेवा :  पुणे येथील सिंचन भवनामध्ये बारामती तालुक्याच्या जिरायती भागाला वरदान ठरत असलेल्या शिरसाई उपसा सिंचन योजनेतील लाभार्थी शेतकरी व वरिष्ठ अधिकार्‍यांची नुकतीच बैठक पार पडली. यामध्ये शिरसाई योजनेतील विविध अडचणी व योजना पूर्ण क्षमतेने चालविण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. या वेळी या लाभार्थी शेतकर्‍यांना पूर्ण क्षमतेने पाणी देण्याचा निर्णय घेण्यात आला.

खरीप, रब्बी व उन्हाळी अशी तीन आवर्तने देण्यासाठी प्रत्येक हंगामात शिरसाईसाठी 200 दशलक्ष घनफूट पाणी देण्यात येईल, असे नियोजन करण्यात यावे, अशी मागणी शेतकर्‍यांनी सिंचन भवनातील सभागृहात अधिकार्‍यांसमोर प्रश्न मांडताना केली. लवकरच ही योजना कार्यान्वित करून लाभार्थी गावात पाणी सोडण्यात येईल, असे आश्वासन अधिकार्‍यांकडून देण्यात आले. या बैठकीला पुणे पाटबंधारे प्रादेशिक विभागाचे मुख्य अभियंता हनुमंत गुणाले, अधीक्षक अभियंता सुनंदा जगताप, कुमार पाटील, कार्यकारी अभियंता गुंजाळ, कानिटकर, सहायक अभियंता पवार, बारामती दूध संघाचे संचालक बापूराव गवळी, उंडवडी कपचे सरपंच भरत बनकर, तुकाई पाणी वापर संस्थेचे अध्यक्ष मधुकर भोसले, विठ्ठल जगताप आदींसह शेतकरी उपस्थित होते.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.