Swargate Case: स्वारगेट अत्याचार खटला; न्यायालयात साक्ष देताना पीडितेला अश्रू अनावर, सुनावणी तहकूब

घटनेचा घटनाक्रम सांगताना पीडिता भावूक; पहिल्याच दिवशी साक्ष अपूर्ण, पुढील सुनावणी ५ डिसेंबरला
Pune District Court
Pune District CourtPudhari
Published on: 
Updated on: 

पुणे: स्वारगेट स्थानकातील अत्याचार खटल्याच्या सुनावणीस सुरुवात झाल्याने घटनेतील पीडिता दुपारी बाराच्या सुमारास न्यायालयात साक्ष देण्यासाठी हजर झाली. मात्र, न्यायालयात आपल्यासोबत घडलेल्या घटनेचा घटनाक्रम सांगताना तिला अश्रू अनावर झाले. बोलता बोलता तिला रडू कोसळले आणि पुढे साक्ष देणे कठीण झाले.

Pune District Court
Pune Municipal Corporation Employees: पुणे महापालिकेत समाविष्ट २३ गावांतील ६२३ कर्मचाऱ्यांचे भवितव्य अधांतरी; सेवासमावेशनाचा प्रश्न प्रलंबित

त्यामुळे न्यायालयाने साक्ष नोंदविण्याचे कामकाज काही काळ थांबवून तिला पाणी पिण्यासाठी आणि स्वतःला सावरण्यासाठी विश्रांती दिली. काही वेळानंतरही पीडिता अस्वस्थ असल्याने तिची साक्ष पुढे सुरू ठेवणे शक्य झाले नाही. अखेर न्यायालयाने सुनावणी तहकूब केली. त्यामुळे बहुचर्चित स्वारगेट स्थानकातील अत्याचाराच्या खटल्याच्या प्रत्यक्ष सुनावणीच्या पहिल्याच दिवशी पीडितेची साक्ष अपूर्ण राहिली.

Pune District Court
Pune Drains Diversion: पुण्यात विकासकांच्या सोयीसाठी ४७ नाले वळवले? महापालिका सभेत गंभीर प्रश्न उपस्थित

पुणे जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. एस. देशमुख यांच्या न्यायालयात या खटल्याच्या प्रत्यक्ष साक्षीपुराव्याला शनिवारपासून सुरुवात झाली. त्यानुसार पीडितेला साक्षीसाठी न्यायालयात हजर केले होते. घटनेबाबत माहिती देताना ती भावूक झाली. तिची अवस्था लक्षात घेऊन न्यायालयाने साक्ष नोंदवण्याची प्रक्रिया थांबविली.

Pune District Court
Pune Encroachment Drive: पुण्यात अतिक्रमणविरोधी मोहिमेचा धडाका; लक्ष्मी रस्त्यावर दुसऱ्याच दिवशी अतिक्रमणे 'जैसे थे'

विश्रांतीनंतरही साक्ष पुढे सुरू ठेवता न आल्याने न्यायालयाने पुढील सुनावणीसाठी ५ डिसेंबर २०२६ ही तारीख निश्चित केली. दरम्यान, या खटल्यासाठी राज्य शासनाने ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. अजय मिसर यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली आहे. त्यांच्या मार्गदर्शनात सरकार पक्षातर्फे खटल्याचे कामकाज सुरू असून, त्यांना ॲड. प्रथमेश शिंगणे, ॲड. राकेश सोनार आणि ॲड. राधिका नावंदर-जोशी सहकार्य करत आहेत.

Pune District Court
Wedding Muhurat 2026-2027: तुळशी विवाहानंतर लग्नसराईचा धुमधडाका; २५ नोव्हेंबरपासून विवाह मुहूर्तांना सुरुवात

दिशाभूल करून तरुणीवर केला होता अत्याचार

स्वारगेट बसस्थानकात २५ फेब्रुवारी २०२५ रोजी पहाटेच्या सुमारास एका २६ वर्षीय तरुणीवर अत्याचाराची घटना घडली होती. आरोपीने साताऱ्याची बस तिकडे लागते अशी दिशाभूल करून पीडितेला बंद पडलेल्या शिवशाही बसमध्ये नेऊन बलात्कार केला होता. आरोपी दत्तात्रय गाडेला त्याच्या गावातून अटक केली होती. जून २०२६ मध्ये विशेष न्यायालयात त्याच्याविरुद्ध आरोप निश्चित करण्यात आले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.