Wedding Muhurat 2026-2027: तुळशी विवाहानंतर लग्नसराईचा धुमधडाका; २५ नोव्हेंबरपासून विवाह मुहूर्तांना सुरुवात

डिसेंबरमध्ये सर्वाधिक १५, फेब्रुवारीत १४, तर मार्चमध्ये १२ शुभ मुहूर्त; मंगल कार्यालये, लॉन्स आणि केटरिंगच्या बुकिंगला वेग
Wedding
WeddingPudhari
Published on: 
Updated on: 

पुणे: घराघरांत तुळशी विवाहाचा मंगल सोहळा रंगू लागला आहे. तुळशी विवाहाच्या निमित्ताने सुरू झालेला हा उत्साह आता सनई-चौघड्यांच्या सुरांत आणि ‘शुभमंगल सावधान’च्या मंगलध्वनीत बदलणार आहे. कारण, तुळशी विवाहानंतर यंदाच्या लग्‍नसराईला खऱ्या अर्थाने सुरुवात होणार आहे. येत्या २५ नोव्हेंबरपासून विवाहाचे मुहूर्त सुरू होत असून, मार्च २०२७ पर्यंत लग्‍नासाठी अनेक शुभ तारखा आहेत.

Wedding
Loni Kalbhor Lift Incident: लोणी काळभोरमध्ये १९ वर्षीय तरुणी लिफ्टमध्ये १४ तास अडकली; सकाळी वीज आल्यानंतर सुटका

विशेष म्हणजे, डिसेंबरमध्ये सर्वाधिक १५, तर फेब्रुवारीमध्ये १४ विवाह, मार्चमध्ये १२ मुहूर्त असल्याने या तीन महिन्यांत विवाह सोहळ्यांची मोठी धामधूम पाहायला मिळणार आहे. शनिवारपासूनच (दि. २१) घरोघरी सुरू झालेला तुळशी विवाहाचा आनंद मंगळवारपर्यंत (दि. २४) पाहायला मिळणार आहे.

Wedding
Junnar Leopard: जुन्नरच्या शिरोलीत बिबट्याची मादी जेरबंद; परिसरात आणखी दोन बिबट्यांचा वावर

त्यानंतर लग्‍नसराईला सुरुवात होणार असल्याने मंगल कार्यालये, लॉन्स, हॉटेल्स, केटरिंग, सजावट, अशा विवाहाशी संबंधित सेवांच्या बुकिंगलाही वेग आला आहे. दरम्यान, सिंहस्थ काळाच्या पार्श्वभूमीवर विवाह मुहूर्तांचे अत्यावश्यक, आपत्कालीन आणि शुद्ध असे वर्गीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे विवाह निश्चित करताना कुटुंबीयांकडून मुहूर्तांची माहिती घेऊन नियोजन केले जाणार आहे.

Wedding
Someshwar Sugar Factory: सोमेश्वर कारखान्याची उसाला प्रतिटन ३,९५१ रुपयांची उचल; यंदाच्या हंगामातील विक्रमी दराची घोषणा

आपत्कालीन आणि शुद्ध मुहूर्त म्हणजे काय?

आपत्कालीन मुहूर्त म्हणजे सिंहस्थ काळातील काही ठरावीक कालावधीमधील मुहूर्त होय. तर शुद्ध मुहूर्त म्हणजे सिंहस्थ काळातील; पण योग्य कालावधीतील मुहूर्त. यंदा दोन्ही प्रकारचे विवाह मुहूर्त आहेत.

शुद्ध विवाह मुहूर्त

  • जानेवारी २०२७ : २७, २९

  • फेब्रुवारी २०२७ : २, ३, १०, ११, १२, १५, १६, २१, २२, २३, २४, २५, २७, २८

  • मार्च २०२७ : २, ४, १०, ११, १४, २०, २३, २४, २५, २७, २९, ३१.

Wedding
Pune Wildlife Water Shortage: पुण्यातील टेकड्यांवरील कृत्रिम पाणवठे कोरडे; वन्यजीवांची पाण्यासाठी भटकंती

नोव्हेंबर ते मार्च विवाह मुहूर्त

आपत्कालीन, अत्यावश्यक विवाह मुहूर्त

  • नोव्हेंबर २०२६ : २५, २६

  • डिसेंबर २०२६ : २, ३, ४, ५, १०, १२, १३, १४, १५, १८, १९, २७, २८, ३०, ३१

  • जानेवारी २०२७ : १, २, ४, २०, २४, २६.

डिसेंबरमध्ये सर्वाधिक १५, फेब्रुवारीमध्ये १४, तर मार्चमध्ये १२ विवाह मुहूर्त आहेत. जानेवारीतही अत्यावश्यक आणि शुद्ध असे मुहूर्त उपलब्ध आहेत. त्यामुळे विवाह इच्छुक जोडप्यांना लग्‍नाचे नियोजन करण्यासाठी अनेक तारखा मिळणार आहेत.

माेहन दाते, पंचांगकर्ते

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.