

पिंपरी(पुणे) : जुन्या भांडणाच्या रागातून दुचाकीवरून जाणार्या तरुणाला चार ते सहा जणांनी मिळून मारहाण केली. ही घटना रविवारी (दि. 20) रात्री साडेअकराच्या सुमारास मोहननगर, चिंचवड येथे घडली. या प्रकरणी परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आयुष जितेंद्र मोरे (18, रा. महात्मा फुलेनगर, चिंचवड) यांनी शनिवारी (दि. 26) पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी संशयित अरविंद ऊर्फ सोन्या काळे (22), युवराज रमेश काळे (24), सुमीत कमळाकर दाभाडे (21, सर्व रा. मोहननगर, चिंचवड) यांच्यासह दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.
अरविंद उर्फ सोन्या काळे यांच्या फिर्यादीनुसार, आयुष मोरे, प्रवीण हिरेमठ, विशाल सूर्यवंशी (25), रोहन उर्फ बाळा खरे (24), शुभम फडतरे (19), सिद्धेश केसवंड (20), करण ससाणे (18) यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, फिर्यादी आयुष हे आपला मित्र प्रवीण हिरेमठ यांच्यासोबत दुचाकीवरून घरी चालले होते. त्यावेळी जुन्या भांडणाच्या रागातून संशयित अरविंद याने शिवीगाळ करत आयुष यांची दुचाकी खाली पाडली. तसेच त्यांना हाताने मारहाण केली.
युवराज आणि सुमित याने दगड, कोयत्याने मारून जखमी केले. अरविंद यांच्या फिर्यादीनुसार, आई आणि भाऊ सोबत फिर्यादी हे घराबाहेर बसले होते. त्यावेळी दुचाकीवरून आलेले आयुष, प्रवीण हे रागाने बघत होते. रागाने का बघतो, अशी विचारणा अरविंद यांनी केली. त्यावेळी शिवीगाळ करत आयुष आणि प्रवीण यांनी फोन करून संशयित विशाल, रोहन, शुभम, करण यांना बोलावून घेतले. या संशयित आरोपींनी अरविंद यांना मारहाण केली.
हेही वाचा