अहमदनगर लष्करी विभागाच्या हद्दीतील 634 बांधकामे अनधिकृत | पुढारी

अहमदनगर लष्करी विभागाच्या हद्दीतील 634 बांधकामे अनधिकृत

अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : लष्करी विभागाच्या सर्वेक्षणात अहमदनगर शहर व जवळच्या परिसरात तब्बल 634 बांधकामे ना हरकत प्रमाणपत्र नसताना बांधण्यात आली आहेत. या बांधकामांचे लष्करी प्रशासन, महसूल आणि महापालिका यांच्या वतीने संयुक्त सर्वेक्षण होणार आहे. त्यामुळे बांधकाम मालकांचे धाबे दणाणले आहे.

शुक्रवारी बैठक झाली. यावेळी अहमदनगर लष्करी विभागाचे अधिकारी, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, महापालिका आयुक्त जावळे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे, प्रातांधिकारी सुधीर पाटील, भूसंपादन अधिकारी बालाजी क्षीरसागर व रचनाकार विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत लष्करी विभागाचे बनावट ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) प्रकरणावर चर्चा झाली. लष्करी संस्थांच्या जवळील एक, दोन मजली इमारती आणि व्यावसायिक बांधकामे करण्यासाठी 100 मीटर व बहुमजली बांधकामासाठी 500 मीटर अंतराचा संरक्षण विभागाचा नियम आहे. या नियमाचे उल्लंघन करून संबंधितांनी 634 बांधकामे झाल्याचे लष्कराच्या सर्वेक्षणात आढळून आल्याचे बैठकीत सांगण्यात आले. या बांधकामांचे लष्करी विभागाचे अधिकारी, महसूल यंत्रणा व महापालिका यांच्यावतीने संयुक्त सर्वेक्षण करण्याचा निर्णय झाला आहे. आता टपालाद्वारे एनओसी न स्वीकारण्याचा, प्रत्यक्ष लष्कराकडून, हस्ते एनओसी स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा

नाशिक : पुलाअभावी गर्भवतीचा डोलीतून प्रवास, मुरुंबटी ग्रामस्थांनी धोकादायक नदीतून गाठले रूग्णालय

नाशिक : गणेश गुसिंगेच्या मोबाइलमध्ये वनविभागाच्या प्रश्नपत्रिका

मृणाल गांजाळेंमुळे आंबेगाव तालुक्याचे नाव देशात

Back to top button