SPPU Geography Amrit Mahotsav: विद्यापीठाच्या भूगोल विभागाचा अमृतमहोत्सवी सोहळा उत्साहात पार

देशभरातून ३५० आजी-माजी विद्यार्थी व मान्यवरांचे सहभाग; भूगोल विभागाला नवा ‘जिओस्पेशियल’ सन्मान
SPPU Geography Amrit Mahotsav
विद्यापीठाच्या भूगोल विभागाच्या अमृतमहोत्सवी सोहळ्यात उपस्थित मान्यवरPudhari
Published on
Updated on

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या भूगोल विभागाचा अमृत महोत्सव सोहळा रविवारी भूशास्त्र विभागाच्या सभागृहात अत्यंत उत्साहपूर्ण आणि औत्सुक्यपूर्ण वातावरणात पार पडला. देशभरातील विविध भागांतून आलेले सुमारे ३५० आजी-माजी विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या सोहळ्यासाठी उपस्थित होते.

SPPU Geography Amrit Mahotsav
Yashwantrao Lele Jnana Prabodhini: ‘ज्ञान प्रबोधिनी’चे संस्थापक कार्यकर्ते यशवंतराव लेले यांचे निधन

कार्यक्रमासाठी शिवाजीराव देशमुख, माजी सचिव, सहकार व पणन विभाग, महाराष्ट्र शासन आणि भूगोल विभागाचे १९६५-१९६७ चे विद्यार्थी यांनी कार्यक्रमाला विशेष उपस्थिती लावली. सोहळ्याचे अध्यक्ष म्हणून कुलगुरू प्रा. डॉ. सुरेश गोसावी तर प्रमुख उपस्थिती म्हणून प्र-कुलगुरू प्रा. डॉ. पराग काळकर हे हजर होते.

SPPU Geography Amrit Mahotsav
Agryahun Sutka Palakhi Sohala Pune: आग्राहून सुटका स्मृतिदिनानिमित्त पुण्यात पालखी सोहळा

भूगोल विभागाचे प्रमुख प्रा. अमित धोर्डे यांनी स्वागतपर भाषण करताना विभागात कार्यरत राहिलेल्या सर्व दिवंगत शिक्षक-शिक्षकेत्त‍र कर्मचाऱ्यांना श्रद्धांजली वाहिली. विभागाच्या समृद्ध परंपरेत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या २० माजी कर्मचाऱ्यांचा सत्कार कुलगुरूंच्या हस्ते करण्यात आला.

SPPU Geography Amrit Mahotsav
Dhanori Green Marathon: ‘ग्रीन मॅरेथॉन’ तरुणांना आरोग्याचा संदेश देणारी – मुरलीधर मोहोळ

कार्यक्रमात आयआयटी मुंबईचे मोहम्मद कासिम खान यांनी भूगोल विभागाला मोठा सन्मान जाहीर केला. भूगोल विभागाची 'ओपन-सोर्स जिओस्पेशियल नॉलेज पार्टनर' म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, भू-स्थानिक शिक्षण, संशोधन व जनसंपर्क उपक्रमांच्या समन्वयासाठी विभागप्रमुख नोडल युनिट म्हणून कार्य करणार आहे. प्रमुख पाहुणे शिवाजीराव देशमुख यांनी भूगोल विभागाच्या ७५ वर्षांच्या शैक्षणिक वाटचालीचा गौरवपूर्ण आढावा घेत आठवणींना उजाळा दिला.

SPPU Geography Amrit Mahotsav
Jejuri Bhairavchandi Yajna: विश्व शांतीसाठी जेजुरी गडावर भैरवचंडी यज्ञ हवन

दुपारचे सत्र एक वाजता डॉ. सपना ससाणे यांच्या सूत्रसंचालनाखाली सुरू झाले. प्रा. अमित धोर्डे यांनी विभागातील विद्यमान शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची ओळख करून दिली. प्रा. रवींद्र जायभाये यांनी डिजिटल माध्यमातून विभागाच्या ७५ वर्षांच्या आठवणी प्रभावी सादरीकरणाद्वारे मांडल्या. प्रा. सुधाकर परदेशी यांनी जिओइन्फॉर्मेटिक्स शाखेची प्रगती आणि विभागातील साधनसंपत्तीची माहिती दिली. प्रा. अमित धोर्डे यांनी कार्यक्रमाचा आढावा घेत आभार प्रदर्शन केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news