Someshwar Sugar Factory Election: ‘अजितदादा हयात असते तर हे धाडस झाले असते का?’; सोमेश्वर कारखाना निवडणुकीत जगतापांच्या भूमिकेवरून आरोप-प्रत्यारोप

रविंद्र धंगेकरांचे खुले पत्र; युगेंद्र पवारांकडूनही पुरुषोत्तम जगतापांच्या स्वतंत्र पॅनेलवर टीका
Someshwar Sugar Factory
Someshwar Sugar FactoryPudhari
Published on: 
Updated on: 

बारामती: सोमेश्वर सहकारी साखर कारखाना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विद्यमान अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी घेतलेल्या वेगळ्या भूमिकेवरून राजकीय वातावरण तापले आहे. माजी आमदार तथा शिवसेना नेते रवींद्र धंगेकर यांनी जगताप यांना उद्देशून लिहिलेले खुले पत्र सध्या चर्चेत आले आहे. 'अजितदादा हयात असते तर हे धाडस झाले असते का?' असा थेट सवाल धंगेकर यांनी पत्रातून केला आहे.

Someshwar Sugar Factory
Kharadi Debris Dumping: खराडीतील झेन्सर मैदानावर राडारोडा डम्पिंगचा आरोप; महापालिका ठेकेदारावर कारवाईची मागणी

जगताप यांनी बंडखोरीची भूमिका घेत वेगळी चूल मांडल्याचा संदर्भ देत धंगेकर यांनी, ''जगताप यांना सलग १२ वर्षे कारखान्याचे चेअरमनपद देऊन अजित पवार यांनी मोठी राजकीय ताकद दिली. कारखान्याच्या विस्तारात आणि विकासात अजित पवार यांच्या नियोजनाचा मोठा वाटा होता. त्यामुळे त्यांच्या ऋणाची आणि विश्वासाची जाणीव ठेवणे अपेक्षित होते,'' असे म्हटले आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर पवार कुटुंबीय कठीण परिस्थितीतून जात असताना सुनेत्रा पवार आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी उभे राहण्याऐवजी जगताप यांनी वेगळी भूमिका घेतल्याची टीका धंगेकर यांनी केली आहे. 'दादा हयात असते, तर त्यांच्या विचारांविरोधात जाण्याचे धाडस झाले असते का?' असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

Someshwar Sugar Factory
Pune Garba Training: फायर गरबा, साल्सा अन् बॉलिवूड गरबा; पुण्यात नवरात्रासाठी तरुणाईची जोरदार तयारी

''वैयक्तिक स्वार्थ आणि हट्टासाठी 'सोमेश्वर'चे वैभव पणाला लावू नका. अजूनही वेळ गेलेली नाही. आपल्या निर्णयाचे आत्मपरीक्षण करून अजित पवार यांच्या अधिकृत पॅनेलसोबत उभे राहा,'' असे आवाहनही धंगेकर यांनी केले आहे. दरम्यान, या पत्रावर आता जगताप काय प्रत्युत्तर देतात? याकडे सभासदांचे लक्ष लागले आहे.

Someshwar Sugar Factory
Foreign Education Scholarship Maharashtra: परदेशी उच्च शिक्षणासाठी २१ विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीसाठी निवड; १९ जागा रिक्त

'सोमेश्वर'च्या निवडणुकीत दिवंगत अजितदादा पवार यांचे नाव व छायाचित्र परवानगीशिवाय वापरू नये, अशी भूमिका त्यांच्या पक्षाने घेतली आहे. ही भूमिका योग्य आहे. 'सोमेश्वर'चे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप हे भाजपच्या सहकार्याने निवडणूक लढवत असून, अजितदादांच्या नावाचा व छायाचित्राचा वापर करून भाजप सोमेश्वर कारखान्यात 'मागच्या दाराने' प्रवेश करण्याचा प्रयत्न करीत आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवानेते युगेंद्र पवार यांनी केला आहे.

Someshwar Sugar Factory
Pune Girls Missing Viral Claim: पुण्यातून २२ दिवसांत १२३ मुली गायब? सोशल मीडियावरील दावा पोलिसांकडून फेटाळला

ज्येष्ठ नेते खा. शरद पवार हे पुरंदर आणि बारामती तालुक्यातील दुष्काळी गावांच्या दौऱ्यावर असून, युगेंद्र पवारही त्यांच्यासोबत दौऱ्यात सहभागी झाले आहेत. या वेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी सोमेश्वर कारखाना निवडणुकीबाबत भूमिका स्पष्ट केली. युगेंद्र पवार म्हणाले की, पुरुषोत्तम जगताप यांना अजितदादांनी संधी दिल्यामुळे ते सुमारे बारा वर्षे सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष राहिले. कारखान्याचे नेतृत्व करण्याची क्षमता अनेक व्यक्तींमध्ये असतानाही अजितदादांनी जगताप यांना संधी दिली. कारखान्याच्या कारभारावर अजितदादांचे लक्ष होते.

'पक्षविरोधी काम करणाऱ्यांवर कारवाई'

सोमेश्वर कारखाना निवडणुकीत पुरंदर तालुक्यातील शरद पवार गटातील काही नेत्यांनी पुरुषोत्तम जगताप यांना पाठिंबा दिल्याबाबत विचारले असता युगेंद्र पवार म्हणाले, ''आमच्या पक्षातील कोणी भाजपला पाठिंबा देऊन पक्षविरोधी काम केले असेल, तर याबाबत प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्याशी माझे बोलणे झाले आहे. पक्षविरोधी काम करणाऱ्यांचे पद काढले जाईल.'

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news