Foreign Education Scholarship Maharashtra: परदेशी उच्च शिक्षणासाठी २१ विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीसाठी निवड; १९ जागा रिक्त

खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल गुणवंत विद्यार्थ्यांना संधी; अभियांत्रिकी व तंत्रज्ञान शाखेतील सर्वाधिक ८ विद्यार्थ्यांचा समावेश
Scholarship
ScholarshipPudhari
Published on: 
Updated on: 

पुणे: खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत आणि गुणवंत विद्यार्थ्यांना परदेशातील नामांकित विद्यापीठांमध्ये उच्च शिक्षण घेता यावे, यासाठी राबविण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती योजनेंतर्गत शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी २१ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. उच्च व तंत्र शिक्षण विभागाने १ ऑक्टोबरला शासन निर्णय काढून या निवडीला मान्यता दिली आहे.

Scholarship
Pune Girls Missing Viral Claim: पुण्यातून २२ दिवसांत १२३ मुली गायब? सोशल मीडियावरील दावा पोलिसांकडून फेटाळला

या योजनेंतर्गत पदव्युत्तर पदवी आणि पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमासाठी एकूण ४० जागा उपलब्ध आहेत. क्यूएस रँकिंगमधील गुणवत्ता क्रमांक आणि पात्रतेच्या निकषांनुसार निवड समितीने २१ उमेदवारांची निवड केली. यामध्ये अभियांत्रिकी व तंत्रज्ञान शाखेतील सर्वाधिक आठ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. कला शाखेतील तीन, वाणिज्य एक, विज्ञान तीन, व्यवस्थापन तीन, वास्तुकला एक आणि औषधनिर्माणशास्त्रातील दोन विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मंजूर झाली आहे. विधी अभ्यासक्रमासाठी एकही विद्यार्थी पात्र ठरलेला नाही.

Scholarship
Pune Ramwadi Ubale Nagar Metro: रामवाडी-उबाळेनगर मेट्रो विस्ताराचा मार्ग मोकळा; सुधारित आराखड्याला अंतिम मंजुरीची प्रतीक्षा

चुकीची माहिती आढळल्यास कारवाई

शिष्यवृत्ती मंजूर विद्यार्थ्यांना गृहचौकशी, नोटराईज्ड बंधपत्र, जामीनदार, विद्यापीठातील प्रवेश आणि अन्य अटींची पूर्तता करावी लागणार आहे. अभ्यासक्रम निर्धारित कालावधीत पूर्ण करणेही बंधनकारक आहे. चुकीची किंवा खोटी माहिती आढळल्यास शिष्यवृत्तीची रक्कम वसूल करून कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते.

Scholarship
Pune Women Safety: पुण्यातील २४ निर्जनस्थळे अजूनही अंधारात; महिलांच्या सुरक्षेच्या घोषणांना महापालिकेचा ‘खो-खो’!

१९ जागा रिक्त

योजनेतील ४० जागांपैकी २१ जागांवर निवड झाली असून, १९ जागा रिक्त राहिल्या आहेत. वाणिज्य, विज्ञान, व्यवस्थापन, विधी, अभियांत्रिकी व तंत्रज्ञान, वास्तुकला आणि औषधनिर्माणशास्त्र या शाखांमध्ये पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्याने काही जागा रिक्त राहिल्या.

Scholarship
Ambegaon Wild Vegetables: सह्याद्रीच्या कुशीत रानभाज्यांची मेजवानी

पात्र विद्यार्थ्यांची संख्या

  • कला – ३ - ०

  • वाणिज्य – १ – २

  • विज्ञान – ३ – २

  • व्यवस्थापन – ३ – १

  • विधी आभ्यासक्रम – ० -३

  • अभियांत्रिकी व तंत्रज्ञान – ८ – ७

  • वास्तुकला शास्त्र – १ – २

  • औषधनिर्माण शास्त्र – २ – २

  • एकूण पात्र विद्यार्थी २१ रिक्त जागा १९

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news