Pune Garba Training: फायर गरबा, साल्सा अन् बॉलिवूड गरबा; पुण्यात नवरात्रासाठी तरुणाईची जोरदार तयारी

पारंपरिक गरब्यासोबत नव्या प्रकारांना पसंती; महिला-युवतींसह लहान मुले आणि ज्येष्ठांचाही प्रशिक्षण वर्गांना प्रतिसाद
Garba
GarbaPudhari
Published on: 
Updated on: 

पुणे: पारंपरिक गरब्याच्या तालासोबत फायर गरबा, साल्सा, बॉलिवूड गरबा यांसह मंदिरपासून ते सामाजिक संदेशापर्यंतच्या विविध संकल्पनांवर आधारित विशेष सादरीकरणांची यंदा नवरात्रोत्सवात रंगत पाहायला मिळणार आहे. गरब्याच्या या नवनवीन प्रकारांनी तरुणाईला आकर्षित केले असून, शहरातील दांडिया - गरबा प्रशिक्षण वर्गांना तरुण- तरुणींसह लहान मुले आणि ज्येष्ठांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

Garba
Foreign Education Scholarship Maharashtra: परदेशी उच्च शिक्षणासाठी २१ विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीसाठी निवड; १९ जागा रिक्त

खासकरून या प्रशिक्षण वर्गांमध्ये महिला-युवतींची संख्या मोठी असून, दांडियाचे विविध प्रकार शिकण्याकडे कल दिसून येत आहे, तर पारंपरिक गरब्यासह काही नवे प्रकार शिकण्याला तरुणाई प्राधान्य देत आहे. विशेष म्हणजे, गरबा शिकण्यामध्ये केवळ गुजराती आणि मारवाडी समाजातीलच नव्हे, तर महाराष्ट्रीयन तरुण-तरुणींची संख्याही मोठी आहे.

Garba
Pune Girls Missing Viral Claim: पुण्यातून २२ दिवसांत १२३ मुली गायब? सोशल मीडियावरील दावा पोलिसांकडून फेटाळला

नवरात्रोत्सवात दांडिया-गरबाच्या कार्यक्रमांची रेलचेल असते. ठिकठिकाणी आयोजिलेल्या कार्यक्रमांमध्ये, महोत्सवांमध्ये आणि स्पर्धांमध्ये पारंपरिक वेशभूषेत तरुण-तरुणींचा सहभाग असतो. नवरात्रोत्सवाला ११ ऑक्टोबरपासून सुरुवात होत आहे. उत्सवाला अवघे काही दिवस उरल्यामुळे सर्वजण तयारीला लागले आहेत. यंदा मोठ्या प्रमाणात दांडिया-गरबाचे कार्यक्रम आयोजित केले आहेत. याच पार्श्वभूमीवर शहरात विविध ठिकाणी दांडिया-गरबा प्रशिक्षण वर्ग सुरू झाले आहेत. नवरात्रोत्सवासाठी अनेकजण महिनाभर आधीपासून सराव करीत आहेत.

Garba
Pune Ramwadi Ubale Nagar Metro: रामवाडी-उबाळेनगर मेट्रो विस्ताराचा मार्ग मोकळा; सुधारित आराखड्याला अंतिम मंजुरीची प्रतीक्षा

यंदा पारंपरिक गरब्याच्या स्टेप्ससोबतच साल्सा आणि बॉलिवूड गरब्याचे प्रशिक्षण दिले जात आहे. काही प्रशिक्षण वर्गांमध्ये सामाजिक संदेशांवर आधारित विशेष सादरीकरणांची तयारीही सुरू आहे. १८ ते ३५ वयोगटातील तरुण-तरुणींमध्ये गरबा शिकण्याची विशेष आवड दिसून येत आहे. काही प्रशिक्षण वर्गांमध्ये १०० ते १५० जणांचा सहभाग असून, अनेक जण विविध स्पर्धा आणि महोत्सवांमध्ये समूह सादरीकरण करणार आहेत.

Garba
Pune Women Safety: पुण्यातील २४ निर्जनस्थळे अजूनही अंधारात; महिलांच्या सुरक्षेच्या घोषणांना महापालिकेचा ‘खो-खो’!

नृत्यदिग्दर्शिका रंजू ओसवाल म्हणाल्या, यंदा गरबा वर्गाला तरुणाईचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. सध्या १५० तरुण- तरुणी आणि २० लहान मुले प्रशिक्षण घेत आहेत. पारंपरिक गरब्यासोबतच तरुणाईला आकर्षित करण्यासाठी साल्सा आणि बॉलिवूड गरब्याच्या स्टेप्स शिकवल्या जात आहेत. यंदा गरब्यात महाराष्ट्राच्या संस्कृतीची जोड देण्यासाठी चिपळ्या वाद्याचा वापर करून गरबानृत्य सादर केले जाणार आहे. गुजराती गरबा आणि महाराष्ट्रीय वाद्य यांचा मेळ साधून दोन्ही संस्कृतींचा संगम घडविण्याचा प्रयत्न आहे. गरबा आता केवळ गुजराती किंवा मारवाडी समाजापुरता मर्यादित राहिलेला नाही. महाराष्ट्रीय तरुणही तितक्याच उत्साहाने गरबा शिकत आहेत.

नवरात्रोत्सवानिमित्त दरवर्षी दांडिया-गरबाचे प्रशिक्षण ठिकठिकाणी होतात. यंदाही शहर भागासह उपनगर आणि जिल्ह्यात प्रशिक्षण वर्ग आयोजित केले असून, त्याला उत्स्फू‍र्त प्रतिसाद मिळत आहे. गेल्या महिनाभरापासून हे वर्ग सुरू असून, नृत्यदिग्दर्शकांकडून दांडियासह गरबाचे नवनवीन प्रकार शिकवले जात आहे. विशेष म्हणजे या वर्गांमध्ये मोठ्या संख्येने महिला-युवतींचा सहभाग आहे. यावर्षी मोठ्या प्रमाणात दांडिया-गरबाचे कार्यक्रमही रंगणार असून, त्यासाठीची तयारी सध्या सुरू आहे.

जतीन पांडे, नृत्यदिग्दर्शक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news