Pune Girls Missing Viral Claim: पुण्यातून २२ दिवसांत १२३ मुली गायब? सोशल मीडियावरील दावा पोलिसांकडून फेटाळला

रील्स, व्हिडिओ आणि ऑडिओ क्लिपमधून अफवा; पोलिसांची पडताळणी सुरू, अप्रमाणित माहिती पसरविणाऱ्यांवर कारवाईचा इशारा
Pune Police
Pune Police Pudhari
Published on: 
Updated on: 

पुणे: पुणे शहरात अपहरण करणारी टोळी सक्रिय असून, 'गेल्या २२ दिवसांत शहरातून १२३ मुली गायब झाल्या आहेत', अशा आशयाच्या रील्स, व्हिडिओ आणि ऑडिओ क्लिप समाज माध्यमांवर व्हायरल होत आहेत. मात्र, या दाव्यांना पुष्टी देणारी कोणतीही माहिती अथवा पुरावा पडताळणीत समोर आलेला नसल्याचे पुणे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. नागरिकांनी अशा अप्रमाणित माहितीवर विश्वास ठेवू नये, तसेच अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही पोलिसांनी दिला आहे.

Pune Police
Pune Ramwadi Ubale Nagar Metro: रामवाडी-उबाळेनगर मेट्रो विस्ताराचा मार्ग मोकळा; सुधारित आराखड्याला अंतिम मंजुरीची प्रतीक्षा

गेल्या काही दिवसांपासून महिलांच्या सुरक्षेशी संबंधित एक ऑडिओ क्लिप आणि त्यावर आधारित व्हिडिओ समाज माध्यमांवर फिरत आहेत. मदत मागण्याच्या बहाण्याने मुलींना पळवून नेले जात असल्याचा दावा या क्लिपमध्ये केला आहे. तसेच '२२ दिवसांत पुण्यातून १२३ मुली, तर राज्यातून २३ हजार मुली बेपत्ता झाल्या', असाही दावा केला आहे.

Pune Police
Pune Women Safety: पुण्यातील २४ निर्जनस्थळे अजूनही अंधारात; महिलांच्या सुरक्षेच्या घोषणांना महापालिकेचा ‘खो-खो’!

एका महिलेने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून प्रसारित केलेल्या क्लिपनंतर अनेक सोशल मीडिया क्रिएटरनी कोणतीही खातरजमा न करता त्याच माहितीच्या आधारे नवीन रील्स आणि व्हिडिओ तयार केले. त्यामुळे ही माहिती वेगाने पसरली. व्हायरल क्लिपमध्ये पुण्यातील सनसिटी परिसराचाही उल्लेख असल्याने नागरिकांकडून पोलिसांकडे विचारणा सुरू झाली.

Pune Police
Ambegaon Wild Vegetables: सह्याद्रीच्या कुशीत रानभाज्यांची मेजवानी

पोलिसांकडून संबंधितांची चौकशी

गुन्हे शाखेचे आयुक्त गौहर हसन यांनी सांगितले की, समाज माध्यमांवर प्रसारित रील्स आणि ऑडिओ रेकॉर्डिंगची गुन्हे शाखा तसेच स्थानिक पोलिसांकडून पडताळणी करण्यात आली. ऑडिओ रेकॉर्ड करणाऱ्या व्यक्तीशी संपर्क साधून माहिती घेण्यात आली. संबंधित सोसायटीचे व्यवस्थापन, शेजारी आणि अन्य संबंधितांकडेही चौकशी करण्यात आली.

Pune Police
Ghod Dam latest news: घोड नदीतील बंधारे कोरडेठाक! शेतकऱ्यांसमोर पाणीटंचाईचे संकट; इनामगाव परिसरातील स्थिती

सद्य:स्थितीत अशा स्वरूपाची घटना घडल्याचे सिद्ध करणारी कोणतीही माहिती अथवा पुरावा समोर आलेला नाही. मात्र, प्रकरणाची सविस्तर चौकशी सुरू आहे. तपासात काही तथ्य अथवा पुरावे समोर आल्यास त्यानुसार कारवाई करण्यात येईल. तसेच, खातरजमा न करता अफवा पसरविणाऱ्यांवरही नियमानुसार कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news