पुणे : आळेफाटा येथे दरोडा टाकणारे सहा आरोपी जेरबंद

आळेफाटा येथील दरोड्यातील सहभागाप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींसह पोलिस
आळेफाटा येथील दरोड्यातील सहभागाप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींसह पोलिस

आळेफाटा : पुढारी वृत्तसेवा : आळेफाटा (ता. जुन्नर) येथे पिस्तुलाचा धाक दाखवून इलेक्ट्रॉनिक्स दुकानातील रोख रक्कम चोरून नेल्याची घटना सोमवारी (दि. ७) रात्री साडेदहा वाजता घडली होती. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद होती. या प्रकरणाचा छडा लावण्यात आळेफाटा पोलिसांना यश आले आहे. त्यातील सहा आरोपींना पोलिसांनी अहमदनगरमधून जेरबंद केले.

७ डिसेंबर रोजी रात्री साडेदहा वाजता बोरी बुद्रुक येथील अविनाश पटाडे यांचे आळेफाटा येथील नगर-कल्याण रोडवरील साई इलेक्ट्रॉनिक्सचे दुकानात प्रवेश केला होता. त्यानंतर पटाडे यांना बंदुकीचा धाक दाखवून दुकानातील रोख १८ हजार रुपये, मोबाईल व दुचाकी चावी घेऊन हे चोरटे पसार झाले होते. काही दिवसांपूर्वीच चौदा नंबर येथील अनंत पतसंस्थेवर भर दुपारी दरोडा पडला होता. त्यामध्ये पतसंस्थेचे व्यवस्थापक राजेंद्र भोर यांचा मृत्यू झाला होता. या घटनेचा तपास अद्याप सुरु असताना ह्या चोरीने जुन्नर तालुक्यात खळबळ माजली होती.

पोलिस पथकांनी काढला माग

त्यानंतर ग्रामीण पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊ चौकशीचे आदेश दिले होते. या गुन्ह्याच्या तपासासाठी ग्रामीण पोलिसांनी वेगवेगळी पथके तयार केली होती. ही पथके तपास करत असताना त्यांना आरोपी बँड-डीजे व्यवसायाशी संलग्न असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले. पोलिसांनी त्यादिशेने तपास सुरु ठेवला. गुप्त बातमीदाराच्या बातमीच्या आधारे त्यातील सहा आरोपींना अवघ्या ७२ तासात अहमनगर जिल्यातील नेवासा तालुक्यातून अटक केली.

हृषीकेश बळवंत पंडीत (वय २२, रा. खरंडी, ता.नेवासा), अरबाज नवाब शेख (वय २०, रा. वडाळा व्हेरोबा, ता. नेवासा), वैभव रविंद्र गोरे (वय २१, रा. खरवंडी, ता. नेवासा), राहुल राम चव्हाण (वय २०, रा. खरवंडी, ता. नेवासा), शुभम बाळासाहेब शिंदे (वय २१, रा. खरवंडी ता. नेवासा) आणि प्रकाश विजय वाघमारे (वय २०, रा. माळी चिंचोरा ता. नेवासा) अशी आरोपींची नावे असल्याचे पत्रकार परिषदेत अप्पर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे यांनी सांगितले.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news