Leopard Sightings: सिंहगड–पानशेतमध्ये बिबट्यांचा उच्छाद! वीसहून अधिक बिबटे सक्रिय; पर्यटकांना कडक सूचना

चितळाचा फडशा, पाळीव जनावरांवर हल्ले वाढले; शनिवार–रविवारी मोठी गर्दी होत असल्याने वन विभागाकडून पर्यटकांना खबरदारीचे आवाहन
Leopard Sightings
Leopard Sightingspudhari
Published on
Updated on

वेल्हे: घनदाट जंगल आणि दाट वनराई गवताळ, झुडपांंनी वेढलेल्या सह्याद्रीच्या डोंगररांगांतील सिंहगड-पानशेत परिसरात बिबट्यांची दहशत वाढली आहे. वासरे, शेळ्या मेंढ्या, कुत्री अशा लहान जनावरांची शिकार बिबटे करत आहेत. पानशेत जवळील आंबी ( ता. हवेली) येथे एका चितळाचा बिबट्याने फडशा पाडला असल्याचे उघडकीस आले आहे. सध्या शनिवार, रविवार तसेच सुट्टीच्या दिवशी हजारोंच्या संख्येने पर्यटक सिंहगड, पानशेत सह या परिसरातील जंगल रानात वनविहार करण्यासाठी गर्दी करत आहेत त्यामुळे वन विभागाने पर्यटकांना खबरदारीचे आवाहन केले आहे. ‌

Leopard Sightings
Municipal Election: जुन्नरमध्ये शिवसेना-भाजप एकत्र येणार की ‘वेगळे रिंगण’? उमेदवारीतूनच गोंधळ शिगेला!

सिंहगड किल्ल्याच्या परिसरात दहा तर पानशेत वरसगावच्या धरण परिसरात दहा असे वीसहून अधिक बिबटे असल्याचे वन विभागाचे म्हणणे आहे, ‌त्यामुळे सिंहगड घाट रस्त्यावर तसेच आडबाजूच्या रस्त्यावर,जंगलात वाहने उभी करून पर्यटकांनी मौजमजा करू नये, पार्ट्या करू नयेत असे आवाहन वन विभागाने केले आहे.

Leopard Sightings
Cyber Fraud: पोलिस गणवेशात समोर आला आणि व्हिडीओ कॉलवरच 48 लाख साफ!

सिंहगड वन विभागाचे वन परिमंडळ अधिकारी समाधान पाटील म्हणाले, आंबी येथे बिबट्याने चितळाची शिकार केल्याचे निष्पन्न झाले आहे. ‌सिंहगड किल्ल्याच्या परिसरात दहाहून अधिक बिबटे असल्याने दररोज सायंकाळी सहा नंतर गड पर्यटकांना बंद करण्यात येत आहे. गडाच्या घाट रस्त्यावर तसेच आडबाजूच्या रस्त्यावर जंगलात वाहने उभी करण्यास तसेच वन सफारी करण्यास मनाई करण्यात आली आहे.

Leopard Sightings
Sandalwood Tree Theft: आगाखान पॅलेसच्या आवारातून चंदनाचे झाड चोरी! पोलिसांची तपासयंत्रणा सक्रिय

आंबीचे सरपंच पोपटराव निवंगुणे हे पहाटे पाच वाजता गावात मोटरसायकलवरून जात असताना त्यांना रस्त्याच्या मध्यभागी एक धष्टपुष्ट बिबट्या बसल्याचे दिसले. निवंगुणे गाडीचे हाॅर्न जोरा जोरात वाजवल्या नंतर बिबट्या शेजारच्या जंगलात निघून गेला. पानशेत वन विभागाच्या वन परिमंडळ अधिकारी वैशाली हाडवळे म्हणाल्या, राजगड पानशेतच्या जंगलात बिबट्यांसह वन्यजीवांचा अधिवास आहे.त्यामुळे जंगला शेजारच्या गावात जनजागृती सुरू करण्यात आली आहे.

Leopard Sightings
Water Leakage Issue: महिनाभरापासून पाणी गळती! हजारो लिटर पाणी वाया, नागरिक संतप्त

जंगलातील वन्यप्राण्यांची बिबटे शिकार करतात, मात्र जंगलापर्यंत खासगी फार्म हाऊस, हाँटेलसह मनोरंजन पार्क सुरू झाली आहेत त्यामुळे बिबटे शिकारीसाठी रानात चरण्यासाठी सोडलेल्या शेळ्या मेंढ्या वासरे अशा लहान जनावरांची शिकार करत असल्याचे वन विभागाने स्पष्ट केले आहे ‌

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news