Shravan Sari 2026: पुण्यात रंगणार महिलांसाठी ‘श्रावण सरी’; कस्तुरी श्रावण क्वीनसह मनोरंजनाची मेजवानी

३ सप्टेंबरला अण्णा भाऊ साठे सभागृहात सोहळा; मालिकांमधील कलाकारांची उपस्थिती, मंगळागौर, खेळ, लकी ड्रॉ आणि आकर्षक भेटवस्तूंची लयलूट
Shravan Sari
Shravan SariPudhari
Published on
Updated on

पुणे: श्रावण म्हणजे उत्साह, सण-उत्सव आणि महिलांसाठी आनंदाचा जल्लोष... याच उत्साहाला मनोरंजनाची आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची जोड देत पुण्यात महिलांसाठी ‘श्रावण सरी’ या खास सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

Shravan Sari
Pune Rural Police Ganeshotsav Security: गणेशोत्सवासाठी पुणे ग्रामीण पोलिस सज्ज; मंडळांना सीसीटीव्ही, स्वयंसेवक अन् ‘नो ड्रग्स’चा संदेश देण्याच्या सूचना

दै. पुढारी कस्तुरी क्लब आणि ‘सन मराठी’च्या वतीने गुरुवारी (दि. ३ सप्टेंबर) सकाळी साडेअकरा वाजता पुणे-सातारा रस्त्यावरील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे सभागृहात हा सोहळा रंगणार आहे. ‘कस्तुरी श्रावण क्वीन’ स्पर्धेची रंगत, लोकप्रिय मालिकांमधील कलाकारांची उपस्थिती, मनोरंजक खेळ, सांस्कृतिक कार्यक्रम, लकी ड्रॉ आणि आकर्षक भेटवस्तू, यामुळे ‘श्रावण सरी’ सोहळा महिलांसाठी आनंद, उत्साह आणि मनोरंजनाची अनोखी पर्वणी ठरणार आहे.

Shravan Sari
Pune DJ Ban: ‘डीजेसमर्थकांना नाही, जनतेला अभय द्या’; पुणेकरांचा डीजेबंदीच्या मागणीसाठी एल्गार

पुढारी कस्तुरी क्लबच्या वतीने नेहमीच महिलांसाठी विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. त्याचाच एक भाग म्हणून ‘श्रावण सरी’ कार्यक्रम आयोजित केला आहे. पारंपरिक मंगळागौर सादरीकरण कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण राहणार आहे. संगीत, नृत्य, खेळ आणि हास्यविनोदाने सोहळ्याला रंगत येणार आहे. तसेच, या कार्यक्रमाला आणखी रंगत येणार आहे ती ‘सन मराठी’ वाहिनीवरील कलाकारांच्या उपस्थितीने. ‘सन मराठी’ वाहिनीवरील ‘सौभाग्यवती वृंदा मोहन’ या लोकप्रिय मालिकेतील स्वाती भिंगारदिवे (वृंदा), संग्राम समेळ (अभिमन्यू) यांच्यासह ‘सखा माझा पांडुरंग’ मालिकेतील सान्वी जांबेकर (सखू) आणि गणेश जाधव (दिघू) या कलाकारांची विशेष उपस्थिती राहणार आहे.

Shravan Sari
Pune Ganeshotsav DJ Sound Pollution: गणेशोत्सव मंडळांचा सन्मान राखा, पुणेकरांनाही त्रास होऊ देऊ नका; डीजेच्या आवाजावर संतुलित निर्णयाची मागणी

महिलांना कलाकारांशी संवादाची संधी मिळणार असून, छायाचित्रेही काढता येणार आहे. लोकप्रिय मालिकांमधून घराघरांत पोहचलेले हे कलाकार प्रत्यक्ष कार्यक्रमात सहभागी होणार असल्याने कस्तुरी सदस्यांमध्येही उत्साहाचे वातावरण आहे. इतकेच नव्हे, तर महिलांसाठी ‘पुढारी कस्तुरी श्रावण क्वीन २०२६’ ही स्पर्धाही होणार आहे. सौंदर्याबरोबरच बुद्धिमत्ता, आत्मविश्वास, संस्कृती आणि व्यक्तिमत्त्वाचा सुरेख संगम या स्पर्धेत पाहायला मिळणार आहे. महिलांसाठी विविध मनोरंजक खेळ, उपक्रम आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानीही असेल. महिलांच्या दैनंदिन धावपळीतून काही क्षण स्वतःसाठी मिळावेत, मैत्रिणींसोबत आनंदाचे क्षण अनुभवता यावेत आणि आपल्या कलागुणांना व्यासपीठ मिळावे, हा या कार्यक्रमामागील उद्देश आहे. महिलांनी या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

Shravan Sari
Rajgurunagar Crime: बहिणीशी बोलत नसल्याच्या रागातून पत्नीचा गळा आवळून खून; मुलावरही चाकूहल्ला

कार्यक्रमात असणार बक्षीसांची लयलूट

‘श्रावण सरी’ कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या महिलांसाठी लकी ड्रॉचेही आयोजन केले आहे. उपस्थितांमधून पाच भाग्यवान विजेत्यांची निवड करण्यात येणार असून, त्यांना विशेष बक्षिसे दिली जाणार आहेत. विशेष म्हणजे, कार्यक्रमास उपस्थित राहणाऱ्या प्रत्येक कस्तुरी सदस्यासाठी आयोजकांकडून आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहे. या विशेष कार्यक्रमासाठी रितू लोखंडे यांचे लोखंडेस स्टायलिंग स्टुडिओ, लीना करपे यांचे डिझाइन स्टुडिओ, डॉ. रवींद्र बर्वे यांचे एस्ट्रोहब आणि मंजूषा देशमुख यांचे व्हाइट पर्ल हे गिफ्ट पार्टनर आहेत. निखिल वन ग्रॅम गोल्ड फॉर्मिंग ज्वेलरीतर्फे कार्यक्रमाला येणाऱ्या प्रत्येक महिलेला मिनी मंगळसूत्र भेट दिले जाणार आहे.

सहभागी होण्यासाठी इथे करावा संपर्क

पुढारी कस्तुरी क्लबतर्फे आयोजित या विशेष कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी ८८८८८०८०२७ आणि ८६००४०२३२३ या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

  • कार्यक्रम कधी : गुरुवारी, दि. ३ सप्टेंबर २०२६

  • कुठे : लोकशाहीर अण्णा भाऊ साठे सभागृह, पुणे-सातारा रस्ता

  • वेळ : स ११.३० वा. ते दु. ३.०० वा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news