Rajgurunagar Crime: बहिणीशी बोलत नसल्याच्या रागातून पत्नीचा गळा आवळून खून; मुलावरही चाकूहल्ला

राजगुरुनगरमध्ये धक्कादायक घटना; आईचा मृतदेह पाहून आरडाओरडा करणाऱ्या १७ वर्षीय मुलाच्या खुनाचा प्रयत्न
Crime News
Crime NewsPudhari
Published on
Updated on

राजगुरुनगर: बहिणीशी बोलत नसल्याच्या रागातून आपल्या पत्नीचा गळा आवळून खून केल्याची आणि घटना माहिती झाल्यावर आरडाओरडा करणाऱ्या मुलावरही चाकूने वार करून त्याचा देखील खून करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना राजगुरुनगर शहरात घडली आहे. महेंद्र शिवाजी दौंडकर (वय ४५) संगम गार्डन, वाडा रोड, राजगुरुनगर (मुळ रा कनेरसर, ता. खेड) असे यातील आरोपी पतीचे नाव आहे.

Crime News
Pune Metro Skywalk: पुणे मेट्रो स्थानकांवर ‘स्काय वॉक’ची सुरक्षा कवच; ८ पादचारी पूल प्रवाशांच्या सेवेत

फिर्यादी मुलगा दिलेल्या तक्रारीनुसार, रविवारी (दि ३०) रात्री सुमारे ९:३० ते ११:३५ या कालावधीत वाडा रोड येथील राहत्या घरात ही घटना घडली. फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, त्यांचे वडील महेंद्र दौंडकर यांनी आपल्या पत्नी मयत दिपा महेंद्र दौंडकर (वय ४०) यांचा त्यांच्या बहिणीशी बोलत नसल्याने गळा आवळून खून केला.

Crime News
Pune Chikoo Prices: पुणे मार्केट यार्डात चिक्कू स्वस्त; आवक वाढल्याने भावात १० टक्क्यांची घसरण

मुलगा आईला उठवण्यासाठी बेडरूममध्ये गेल्यावर ही घटना उघडकीस आली. यावेळी आरोपीने मुलाचाही ओढणीने गळा आवळण्याचा प्रयत्न केला. मुलगा झटापट आणि आरडाओरडा करत बाहेर जाण्याचा प्रयत्न करत असताना “तुला चाकूने घुपसेन” अशी धमकी देत उजव्या हाताच्या अंगठ्यावर चाकूने वार केला.

Crime News
Pune Market Yard Vegetable Prices: पुणे मार्केट यार्डात फळभाज्या स्वस्त; मटार, मिरची, घेवडा, टोमॅटोच्या भावात १० टक्के घसरण

या तक्रारीवरून खेड पोलीस ठाण्यात विविध कलमांतर्गत सोमवारी सकाळी (दि ३१) गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक सुभाष चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news