Pune Rural Police Ganeshotsav Security: गणेशोत्सवासाठी पुणे ग्रामीण पोलिस सज्ज; मंडळांना सीसीटीव्ही, स्वयंसेवक अन् ‘नो ड्रग्स’चा संदेश देण्याच्या सूचना

कर्णकर्कश साऊंड, लेझर-बीम लाईट टाळण्याचे आवाहन; महिला-मुलींच्या सुरक्षेसाठी विशेष खबरदारी घेण्याचे निर्देश
Police
PolicePudhari
Published on
Updated on

पुणे: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण पोलिस यंत्रणा सज्ज झाली आहे. गणेश मंडळांनी सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, स्वयंसेवकांच्या माध्यमातून देखरेख ठेवावी, तसेच ध्वनीप्रदूषण वाढवणारा कर्णकर्कश साऊंड आणि लेझर लाईट, बीम लाईट शो टाळावेत, अशा स्पष्ट सूचना पोलिस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांनी दिल्या.

Police
Pune DJ Ban: ‘डीजेसमर्थकांना नाही, जनतेला अभय द्या’; पुणेकरांचा डीजेबंदीच्या मागणीसाठी एल्गार

गणेशोत्सवाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिस मुख्यालयात गणेश मंडळांचे अध्यक्ष, पदाधिकारी आणि पोलिस पाटील यांची बैठक घेण्यात आली. त्या पार्श्वभूमीवर गिल बोलत होते. जिल्ह्यातील शंभरहून अधिक गणेश मंडळांचे पदाधिकारी तसेच जिल्हाधिकारी कार्यालय, महावितरण, परिवहन विभाग यांसह विविध शासकीय यंत्रणांचे प्रतिनिधी बैठकीस उपस्थित होते.

Police
Pune Ganeshotsav DJ Sound Pollution: गणेशोत्सव मंडळांचा सन्मान राखा, पुणेकरांनाही त्रास होऊ देऊ नका; डीजेच्या आवाजावर संतुलित निर्णयाची मागणी

जिल्ह्याच्या ग्रामीण भागात गणेशोत्सव उत्साहात साजरा केला जातो. विविध मंडळांकडून सामाजिक, सांस्कृतिक आणि जनजागृतीपर उपक्रम राबवले जातात. उत्सवाच्या काळात सुरक्षेच्या दृष्टीने मंडळांनी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले. मंडळांनी मंडप व परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत. गर्दीच्या ठिकाणी स्वयंसेवक तैनात करून त्यांच्यामार्फत व्यवस्थेवर लक्ष ठेवावे.

Police
Rajgurunagar Crime: बहिणीशी बोलत नसल्याच्या रागातून पत्नीचा गळा आवळून खून; मुलावरही चाकूहल्ला

रात्रीच्या वेळी स्वयंसेवकांनी मंडळ परिसरात देखरेख ठेवावी, अशा सूचना देण्यात आल्या. मंडळाचा परिसर स्वच्छ ठेवणे, निर्माल्य नदी अथवा जलस्रोतांमध्ये न टाकता पर्यावरणपूरक पद्धतीने विसर्जित करण्याचे आवाहनही करण्यात आले. महिला आणि मुलींच्या सुरक्षेसाठी मंडळांनी विशेष खबरदारी घ्यावी. गर्दीच्या ठिकाणी स्वयंसेवकांनी सतर्क राहावे, तसेच काही अडचण निर्माण झाल्यास तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा, असे पोलिसांनी सांगितले.

Police
Pune Metro Skywalk: पुणे मेट्रो स्थानकांवर ‘स्काय वॉक’ची सुरक्षा कवच; ८ पादचारी पूल प्रवाशांच्या सेवेत

मंडपातून ‘से नो टू ड्रग्स’चा संदेश

गणेशोत्सवाच्या माध्यमातून अमली पदार्थांविरोधात जनजागृती करण्याचे आवाहन ग्रामीण पोलिसांनी मंडळांना केले आहे. मंडळांनी ‘से नो टू ड्रग्स’चा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचवावा. त्यासाठी पोलिसांकडून मंडळांना पोस्टर आणि जनजागृतीपर साहित्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मंडळांनीही पुढाकार घेऊन पथनाट्य, जनजागृतीपर कार्यक्रम आणि अन्य उपक्रमांच्या माध्यमातून तरुणांमध्ये अमली पदार्थांच्या दुष्परिणामांबाबत जागृती करावी, असे आवाहन करण्यात आले.

गणेशोत्सव शांततेत आणि उत्साहात पार पडावा यासाठी आवश्यक बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे. संवेदनशील ठिकाणी विशेष लक्ष ठेवण्याबरोबरच गर्दीच्या ठिकाणी पोलिसांची उपस्थिती वाढवण्यात येणार आहे.

संदीपसिंह गिल्ल, पोलिस अधीक्षक, पुणे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news