Pune DJ Ban: ‘डीजेसमर्थकांना नाही, जनतेला अभय द्या’; पुणेकरांचा डीजेबंदीच्या मागणीसाठी एल्गार

गुडलक चौकात नागरिकांचा आंदोलनातून आवाज; ‘उत्सव साजरे करा, पण नागरिकांच्या आरोग्याशी खेळू नका’
Pune DJ Ban Demand
Pune DJ Ban DemandPudhari
Published on
Updated on

पुणे: ‘डीजेसमर्थकांना नाही, जनतेला अभय द्या’, ‘सण-उत्सव आनंद देण्यासाठी आहेत, शिक्षा देण्यासाठी नाही’, ‘बंद करा, बंद करा... डीजे बंद करा’ आणि ‘नेत्यांनो, आश्वासने नकोत; डीजेविरोधातील भूमिका कृतीतून दाखवा’ असे फलक हातात घेत रविवारी (दि. ३०) पुणेकरांनी डीजेच्या दणदणाटाविरोधात आवाज बुलंद केला.

Pune DJ Ban Demand
Pune Ganeshotsav DJ Sound Pollution: गणेशोत्सव मंडळांचा सन्मान राखा, पुणेकरांनाही त्रास होऊ देऊ नका; डीजेच्या आवाजावर संतुलित निर्णयाची मागणी

फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्यावरील गोपाळ कृष्ण गोखले चौकातील (गुडलक चौक) कलाकार कट्टा येथे गणेशोत्सव आणि दहीहंडीच्या काळात कर्णकर्कश डीजेमुळे होणाऱ्या ध्वनिप्रदूषण विरोधात नागरिकांनी एकत्र येत उत्सवांमध्ये डीजेला मुभा न देता संपूर्ण डीजेबंदी लागू करण्याची मागणी केली. 'उत्सव साजरे करा; मात्र नागरिकांच्या आरोग्याशी खेळू नका' असा स्पष्ट संदेशही देण्यात आला.

Pune DJ Ban Demand
Rajgurunagar Crime: बहिणीशी बोलत नसल्याच्या रागातून पत्नीचा गळा आवळून खून; मुलावरही चाकूहल्ला

गणेशोत्सव, दहीहंडीच्या पार्श्वभूमीवर डीजेमुळे निर्माण होणाऱ्या ध्वनिप्रदूषणाचा प्रश्न चर्चेचा विषय ठरत आहे. उत्सवात डीजेला परवानगी नसावी, अशी मागणी जोर धरत आहे. त्याच पार्श्वभूमीवर काही नागरिकांनी एकत्र येत सण-उत्सवांमध्ये डीजेला बंदी घालावी, अशी मागणी केली. राजेश मनगिरे म्हणाले की, कर्णकर्कश डीजेमुळे केवळ कानांवरच नाही, तर नागरिकांच्या एकूण आरोग्यावरही परिणाम होतो. त्यामुळे ध्वनिप्रदूषणाकडे उत्सवातील किरकोळ बाब म्हणून न पाहता सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने गांभीर्याने पाहिले पाहिजे.

Pune DJ Ban Demand
Pune Metro Skywalk: पुणे मेट्रो स्थानकांवर ‘स्काय वॉक’ची सुरक्षा कवच; ८ पादचारी पूल प्रवाशांच्या सेवेत

अशोक मेहेंदळे म्हणाले, आमचा कोणत्याही ढोल-ताशा पथकाला किंवा डीजेला व्यक्तिशः विरोध नाही. मात्र, उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या नियमांचे पालन व्‍हावे. गेल्या दोन महिन्यांपासून ढोल-ताशा पथकांचा सराव सुरू आहे. त्यातूनही मोठ्या प्रमाणात ध्वनिप्रदूषण होत आहे. याचाही विचार व्‍हावा. कोणताही सण, उत्सव, जयंती किंवा धार्मिक कार्यक्रम असो; आवाजाची मर्यादा ओलांडली जात असेल, तर आमचा त्याला विरोध आहे. मुकुंद किर्दत म्हणाले, कायद्यानुसार ध्वनिमर्यादा निश्चित असतानाही त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नाही. महापौर, महापालिका आयुक्त आणि पोलिस आयुक्तांनी नियमांची कठोर अंमलबजावणी करणे आवश्यक आहे.

Pune DJ Ban Demand
Pune Chikoo Prices: पुणे मार्केट यार्डात चिक्कू स्वस्त; आवक वाढल्याने भावात १० टक्क्यांची घसरण

उत्सवांना विरोध नाही

डीजेविरोधात भूमिका घेत असलो तरी गणेशोत्सव, दहीहंडी आणि अन्य धार्मिक उत्सवांना आपला विरोध नसल्याचे नागरिकांनी स्पष्ट केले. आम्हीही संस्कृतीवादी आहोत. पारंपरिक, धार्मिक आणि शांततेच्या वातावरणात उत्सव साजरे व्हावेत, हीच आमची भूमिका आहे. मात्र, उत्सवाच्या नावाखाली ध्वनिप्रदूषण सहन केले जाणार नाही, असा इशारा या वेळी देण्यात आला.

शनिवारवाडा मार्गावर काढला मोर्चा

डीजेच्या कर्णकर्कश आवाजाविरोधात पुणेकरांच्या वतीने रविवारी बाजीराव रस्ता ते शनिवारवाडा या मार्गावर मोर्चा काढण्यात आला. नागरिक या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी झाले. 'सण-उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरे करा', 'डीजे नको, ढोल पाहिजे' अशा आशयाचे फलक हातात घेत नागरिकांनी डीजेविरोधात आपली भूमिका मांडली. उत्सवांना विरोध नसून, ध्वनिप्रदूषण करणाऱ्या कर्णकर्कश डीजेला विरोध असल्याचे या वेळी नागरिकांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news