Shirur NCP Organization: शिरूरमध्ये सत्ताधारी राष्ट्रवादीची संघटना सुस्त; पदाधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह

शहर-तालुक्यात पक्षवाढीसाठी अपेक्षित हालचालींचा अभाव; नागरिकांच्या प्रश्नांवर पदाधिकारी सक्रिय नसल्याची चर्चा
NCP
NCPpudhari photo
Published on: 
Updated on: 

शिरूर: शिरूर शहर व तालुक्याच्या सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये निरुत्साह दिसत असून, पक्षवाढीसाठी स्थानिक पदाधिकारी कुठेही प्रयत्न करताना दिसत नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर शिरूर तालुक्यात तत्कालीन आमदार अशोक पवार यांच्याबरोबर असलेले अनेक पदाधिकारी हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत गेले. विधानसभेमध्ये राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे ज्ञानेश्वर ऊर्फ माऊली कटके विजयी झाले, तर विद्यमान आमदार अशोक पवार यांचा पराभव झाला.

NCP
Diveagar Accident: दिवेआगर दुर्घटनेतील आळंदीच्या आठ विद्यार्थ्यांना साश्रू नयनांनी अखेरचा निरोप

मागील दोन वर्षांच्या काळात नगरपरिषद आणि जिल्हा पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने चांगले यश मिळवले असले, तरी या निवडणुका या पक्षावर न होता स्थानिक उमेदवार कसा आहे, याकडे पाहूनच नागरिक मतदान करतात. मात्र, या निवडणुका नंतर राष्ट्रवादी काँग्रेसची संघटना जशी उभी राहिली पाहिजे होती तशी उभी राहिली नाही.

NCP
Shirur Firing Incidents: शिरूर तालुक्यात सहा महिन्यांत गोळीबाराच्या पाच घटना; तीन जणांचा मृत्यू

शिरूर शहरातसुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कुठलीही फळी सध्यातरी कार्यरत दिसत नाही. शिरूर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस संघटनेचे कुठलेच काम दिसत नसून पदाधिकारी फक्त मंत्री, आमदार आल्यानंतर तेवढ्यापुरते कार्यालयात येतात आणि फक्त पक्षाची तेवढ्यापुरती भूमिका सांभाळतात. मात्र, परत पक्षाशी आपल्याला काही सोयरसुतक नसल्याची भावना या पदाधिकाऱ्यांमध्ये असून, सत्ताधारी राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी हे शहरात नागरिकांना माहीत असणे गरजेचे होते.

NCP
PM Modi Baramati Visit: पंतप्रधान मोदींचा बारामती दौरा ३ नोव्हेंबरला; विद्या प्रतिष्ठानमधील ‘प्रेरणास्थळा’चे उद्घाटन

मात्र, आजपर्यंत शहराचे कुठलेच पदाधिकारी हे कुठल्या नागरिकांच्या समस्येसाठी पुढे आलेले दिसत नाही. राज्यात सरकार येऊन दोन वर्षे झाली, तरी विविध शासकीय कमिट्या शहरात कार्यरत होणे गरजेचे असताना त्या कमिट्या अजून पूर्ण झालेल्या नाहीत. तालुक्यातसुद्धा अशीच परिस्थिती असून, पक्षाची पाळीमुळे रुजवण्यासाठी पदाधिकारी कमी पडत असल्याचे दिसते. फक्त मंत्र्यांना भेटून फोटो सोशल मीडियावर व्हायरल करणे एवढेच काम या पदाधिकाऱ्यांचे राहिले असल्याचे दिसते. प्रत्यक्षात आज अजितदादांनंतर पक्ष सांभाळणे हे फार मोठे काम असून, पक्षाची ध्येयधोरणे हे तळागाळापर्यंत पोहचविणे, हे पदाधिकाऱ्यांचे काम असून, मात्र शिरूर शहरातील पदाधिकारी मात्र 'हम करे सो कायदा' याप्रमाणे वागत आहेत.

NCP
Someshwar Sugar Factory Election: ‘अजितदादा हयात असते तर हे धाडस झाले असते का?’; सोमेश्वर कारखाना निवडणुकीत जगतापांच्या भूमिकेवरून आरोप-प्रत्यारोप

न. पा. पदाधिकऱ्यांचे काम मात्र प्रामाणिक

याउलट शिरूर नगरपरिषदेमध्ये राष्ट्रवादी पक्षाचे नगराध्यक्ष ऐश्वर्या अभिजित पाचर्णे ह्या निवडून आल्या आणि राष्ट्रवादीचे सात नगरसेवक निवडून आले. त्यांनी मात्र पक्ष व आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्याशी प्रामाणिक राहत पक्षाची ध्येयधोरणे व शासनाच्या माध्यमातून विविध कामे शहरासाठी आणली. नगराध्यक्षांसह नगरसेवक अभिजित पाचर्णे, बांधकाम समिती सभापती सुनील जाधव, स्वच्छता समिती सभापती एजाज बागवान यांनी पक्षाची ध्येयधोरणे तसेच विविध विकासकामे शहरासाठी मंजूर करीत पक्षवाढीसाठी प्रमाणिक प्रयत्न करीत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news