Diveagar Accident: दिवेआगर दुर्घटनेतील आळंदीच्या आठ विद्यार्थ्यांना साश्रू नयनांनी अखेरचा निरोप

आळंदी, केळगावसह अमरावती आणि श्रीरामपूरमध्ये अंत्यसंस्कार; आठ कुटुंबांवर दुःखाचा डोंगर
Alandi Students Funeral
Alandi Students FuneralPudhari
Published on: 
Updated on: 

आळंदी: रायगड जिल्ह्यातील दिवेआगर समुद्रकिनारी गुरुवारी घडलेल्या भीषण दुर्घटनेत काळाच्या पडद्याआड गेलेल्या आळंदीतील आठ विद्यार्थ्यांना शुक्रवारी (दि. २) त्यांच्या कुटुंबीयांनी आणि हजारो नागरिकांनी साश्रू नयनांनी अखेरचा निरोप दिला. कालपर्यंत मित्रांसोबत हसत-खेळत सहलीचा आनंद घेणारी ही मुले आज निष्प्राण अवस्थेत घरी परतली आणि त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आई-वडिलांवर आली. या दृश्याने आळंदी, केळगाव परिसर अक्षरशः हेलावून गेला.

Alandi Students Funeral
Shirur Firing Incidents: शिरूर तालुक्यात सहा महिन्यांत गोळीबाराच्या पाच घटना; तीन जणांचा मृत्यू

दिवेआगर समुद्रकिनारी गुरुवारी सायंकाळी झालेल्या दुर्घटनेत विनर्स अकॅडमीच्या आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला. या घटनेनंतर रात्री उशिरापर्यंत मृतदेह बाहेर काढणे, शवविच्छेदन आणि पार्थिव त्यांच्या कुटुंबीयांकडे सोपविण्याची प्रक्रिया सुरू होती. शुक्रवारी पहाटे विद्यार्थ्यांचे पार्थिव आळंदीच्या दिशेने रवाना करण्यात आले. पार्थिव घरी पोहचताच पालक, नातेवाईक आणि मित्रांचा आक्रोश मन हेलावून टाकणारा होता.

Alandi Students Funeral
PM Modi Baramati Visit: पंतप्रधान मोदींचा बारामती दौरा ३ नोव्हेंबरला; विद्या प्रतिष्ठानमधील ‘प्रेरणास्थळा’चे उद्घाटन

आळंदीत चार जणांचे अंत्यसंस्कार...

तन्मय दत्तात्रय वाहिले, प्रणव रामदास बनसोडे, सुमीत भरत अहिरे आणि कैवल्य सतीश वासनकर या चार विद्यार्थ्यांच्या पार्थिवांवर आळंदी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. आपल्या लाडक्या मुलाला अखेरचा निरोप देताना पालक आणि नातेवाइकांचा आक्रोश उपस्थितांना अस्वस्थ करून गेला. आळंदीतील अंत्यविधीसाठी आळंदी नगरपरिषदेतर्फे आवश्यक व्यवस्था करण्यात आली होती. विविध क्षेत्रांतील मान्यवर, लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, मित्रपरिवार आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दिवंगत विद्यार्थ्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

Alandi Students Funeral
Someshwar Sugar Factory Election: ‘अजितदादा हयात असते तर हे धाडस झाले असते का?’; सोमेश्वर कारखाना निवडणुकीत जगतापांच्या भूमिकेवरून आरोप-प्रत्यारोप

अमरावती आणि श्रीरामपूरमध्येही अंत्यसंस्कार...

यश किरण वानखेडे याचे पार्थिव अमरावती येथे, तर कौस्तुभ संदीप दौंड याचे पार्थिव त्याच्या मूळगावी श्रीरामपूर (जि. अहिल्यानगर) येथे अंत्यसंस्कार करण्यासाठी नेण्यात आले.

सहल संपली; मात्र आठ घरांतील आनंदही हरपला

दिवेआगरला जाताना सोबत असलेले विद्यार्थी या मित्रांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी देखील उपस्थित होते, त्या वेळी त्यांच्या डोळ्यांच्या कडा पाणवल्या होत्या. नियतीच्या एका घावाने ही सहल त्यांच्या आयुष्याचा अखेरचा प्रवास ठरली. अकरावीच्या विज्ञान शाखेत शिक्षण घेणारी ही मुले भविष्यात काय बनायचे? याची स्वप्ने पाहत होती. कुणी डॉक्टर, कुणी इंजिनिअर तर कुणी आपल्या आवडीच्या क्षेत्रात नाव कमावण्याची स्वप्ने उराशी बाळगली असतील. मात्र, त्या स्वप्नांना आता चितेच्या अग्नीत अखेरचा निरोप मिळाला.

Alandi Students Funeral
Kharadi Debris Dumping: खराडीतील झेन्सर मैदानावर राडारोडा डम्पिंगचा आरोप; महापालिका ठेकेदारावर कारवाईची मागणी

केळगावात दोन कुटुंबांचा आक्रोश...

सोहम तुकाराम भांडवलकर आणि राजवीर युवराज वहिले या दोघांच्या पार्थिवावर केळगाव येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. दिवेआगर दुर्घटनेची बातमी समजल्यापासूनच केळगाववर शोककळा पसरली होती. शुक्रवारी दोन्ही विद्यार्थ्यांचे पार्थिव गावात पोहचताच नातेवाईक, मित्र आणि ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली. राजवीर आणि सोहम हे आळंदीच्या शेजारील केळगावचे रहिवासी होते. राजवीरच्या कुटुंबीयांवर तर या घटनेने दुःखाचा डोंगर कोसळला. दोन्ही विद्यार्थ्यांना अखेरचा निरोप देताना संपूर्ण गाव भावुक झाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news