PM Modi Baramati Visit: पंतप्रधान मोदींचा बारामती दौरा ३ नोव्हेंबरला; विद्या प्रतिष्ठानमधील ‘प्रेरणास्थळा’चे उद्घाटन

सकाळी १० वाजता विमानतळावर आगमन; गौतम बुद्धांच्या पुतळ्याचे अनावरण, एआय विद्यार्थ्यांशी संवाद आणि ११.४५ वाजता मुख्य कार्यक्रम
Narendra Modi
Narendra ModiPudhari
Published on: 
Updated on: 

बारामती: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बारामती दौरा आचारसंहितेमुळे पुढे ढकलला गेला आहे. आता नव्या तारखेनुसार ते ३ नोव्हेंबर रोजी बारामती दौऱ्यावर येणार आहेत, अशी माहिती ज्येष्ठ नेते खा. शरद पवार यांनी दिली.

Narendra Modi
Someshwar Sugar Factory Election: ‘अजितदादा हयात असते तर हे धाडस झाले असते का?’; सोमेश्वर कारखाना निवडणुकीत जगतापांच्या भूमिकेवरून आरोप-प्रत्यारोप

खा. पवार म्हणाले, पंतप्रधानांच्या बारामती दौऱ्याबाबत खा. सुप्रिया सुळे व इतर मंत्र्यांनी पाठपुरावा केला होता. आता ते ३ नोव्हेंबर रोजी बारामतीत येतील. सकाळी १० वाजता ते विमानतळावर दाखल होतील. तेथून विद्या प्रतिष्ठान परिसरात येतील. हा कार्यक्रम दोन टप्प्यात होईल.

Narendra Modi
Kharadi Debris Dumping: खराडीतील झेन्सर मैदानावर राडारोडा डम्पिंगचा आरोप; महापालिका ठेकेदारावर कारवाईची मागणी

विद्या प्रतिष्ठानमध्ये प्रेरणास्थळ येथे भगवान गौतम बुद्धांचा ४ टन वजनाचा पुतळा बसवला आहे. याशिवाय राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, अहिल्यादेवी होळकर, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, सयाजीराव गायकवाड, राजर्षी शाहू महाराज, महात्मा गांधी, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, अण्णा भाऊ साठे, यशवंतराव चव्हाण, शारदाबाई पवार यांच्या पेंटींग आहेत. प्रेरणास्थळ उदघाटन व बुद्धांच्या पुतळ्याचे अनावरण त्यांच्या हस्ते होईल. यावेळी ते एआय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार असून नंतर ते मुख्य कार्यक्रमात सहभागी होतील.

Narendra Modi
Pune Garba Training: फायर गरबा, साल्सा अन् बॉलिवूड गरबा; पुण्यात नवरात्रासाठी तरुणाईची जोरदार तयारी

यावेळी राज्यपालांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, एकनाथ शिंदे, मायक्रोसाॅफ्ट व आॅक्सफर्डचे प्रमुख, गेटस फाऊंडेशन, सायरस पुनावारा, बाबा कल्याणी, अतुल चोरडीया, नीलकंठ छाब्रीया, विवेक सावंत, अनिल काकोडकर, सुप्रिया सुळे, पार्थ पवार आदींची उपस्थिती असेल. मुख्य कार्यक्रम ११.४५ वाजता मैदानात सुरु होणार असल्याचे पवार यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news