Shirur Municipal Council: शिरूर नगरपरिषदेत विरोधी पक्षच नाही! उपनगराध्यक्षपदी नितीन पाचर्णे बिनविरोध; सत्तेची दोन्ही प्रमुख पदे पाचर्णे कुटुंबाकडे

भाजपच्या सत्ताधारी गटातील सहभागामुळे विरोधी बाके रिकामी; राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे गटातून बाहेर पडण्याचे पत्र अद्याप प्रलंबित
Shirur Municipal Council Election
Shirur Municipal Council ElectionPudhari
Published on: 
Updated on: 

शिरूर: शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी भाजपचे नितीन पाचर्णे यांची निवड झाल्यामुळे शिरूर नगरपरिषदेत विरोधी पक्ष अस्तित्वात राहिलेला नाही. नगरपालिकेतील सर्वच पक्ष आता सत्ताधारी झालेले आहेत. नगरपालिकेत एकूण २४ नगरसेवक आहेत. त्यामध्ये भाजप ११, राष्ट्रवादी काँग्रेस (अ.प.) ७, राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.) ५ आणि एक अपक्ष, अशी नगरसेवकांची संख्या आहे. निवडणुकीनंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र येत नगरपालिकेत शिरूर नगरपरिषद गट तयार करून सत्ता स्थापन केली.

Shirur Municipal Council Election
Consumer Commission Online Hearing: ग्राहक आयोगाच्या सुनावण्या आता ऑनलाइन; राज्यातील सर्व आयोगांना सुविधा बंधनकारक

मात्र, उपनगराध्यक्ष मितेश गादिया यांच्यावरील अविश्वास ठराव मंजूर झाल्यावर विरोधात असलेल्या भाजपने सत्ताधारी शिरूर नगरपरिषद गटाला पाठिंबा दिला आणि उपनगराध्यक्षपदी भाजपचे नितीन पाचर्णे नियुक्त झाले. विरोधातील भाजपच सत्ताधारी झाल्याने विरोधी पक्षाचे आव्हान संपुष्टात आले. सत्ताधारी शिरूर नगरपरिषद गटात भाजप सामील झाल्याने राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने आम्हाला गटातून बाहेर करावे, असे पत्र आमदार ज्ञानेश्वर कटके, नगराध्यक्षा ऐश्वर्या पाचर्णे व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. त्यावर अद्याप निर्णय न झाल्याने राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातील नगरसेवकसुद्धा अद्याप सत्ताधारी गटात असल्याने विरोधी पक्षात एकही नगरसेवक शिल्लक राहिलेला नाही.

Shirur Municipal Council Election
Pune Metro Skywalk: पुणे मेट्रो प्रवाशांसाठी मोठी सुविधा; सिव्हिल कोर्ट स्थानकातून हिंजवडी मेट्रोला थेट स्कायवॉकने जोडणी

नगरपालिकेत सत्तास्थापनेच्या वेळेस दोन्ही राष्ट्रवादीची युती होऊन शिरूर नगरपरिषद गट स्थापन केल्याने सर्व समित्यांमध्ये या दोन्ही पक्षांचे नगरसेवक विराजमान झाले होते. मात्र, मागील महिन्यात झालेल्या राजकीय घडामोडींनंतर उपनगराध्यक्ष मितेश गादिया यांच्यावर अविश्वास ठराव आणून वीस विरुद्ध शून्य मतांनी तो मंजूर झाल्यानंतर गादिया यांना पायउतार व्हावे लागले, त्याआधी भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिरूर नगरपरिषद गटाला पाठिंबा देण्याचे पत्र दिले होते, त्यामुळे उपनगराध्यक्षपदी भाजपचे गटनेते नितीन पाचर्णे यांची निवड झाली. शिरूर नगरपरिषदेच्या अध्यक्षपदी पाचर्णे व उपनगराध्यक्षपदी पाचर्णे, असे चित्र शिरूर शहराच्या इतिहासामध्ये प्रथमच पाहावयास मिळाले. शिरूर-हवेलीचे माजी आमदार स्व. बाबूराव पाचर्णे यांचे एक स्वप्न होते की शिरूर शहरावर नगराध्यक्ष हा पाचर्णे कुटुंबीयांचा असावा. ते स्वप्न पूर्ण झालेच; शिवाय उपनगराध्यक्षपदी बाबूराव पाचर्णे यांचे पुतणे नितीन पाचर्णे यांची वर्णी लागली. गेल्या पाच दशकांहून शिरूर शहर व पंचकोशीवर राज्य करणारे पाचर्णे कुटुंबीय नगरपालिकेत सत्तास्थानी पोहचू शकले नव्हते. आता पालिकेची दोन्ही महत्त्वाची पदे त्यांना मिळाली आहेत.

Shirur Municipal Council Election
Traditional Blacksmiths In India: दिवाळीतही लोहारांच्या भट्टीची धग कायम; ऐरणीवर घडतात शेतीची अवजारे, कष्टातून साजरे होते लक्ष्मीपूजन

शिरुरच्या उपनगराध्यक्षपदी नितीन पाचर्णे

शिरूरच्या उपनगराध्यक्षपदी भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष तथा नगरसेवक नितीन मच्छिंद्र पाचर्णे यांची शुक्रवारी (दि. ६) बिनविरोध निवड झाली. नगरपरिषदेच्या इतिहासात प्रथमच नगरपरिषदेची सत्तेची चावी पाचर्णे कुटुंबीयांकडे आली आहे. नगराध्यक्षपदानंतर उपनगराध्यक्षपदी नितीन पाचर्णे यांची निवड झाली आहे.

उपनगराध्यक्षपदासाठी शुक्रवारी निवडणूक पार पडली. या पदासाठी नितीन पाचर्णे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी विठ्ठल जोशी यांनी जाहीर केले. यावेळी शिरूर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष ऐश्वर्या अभिजित पाचर्णे, मुख्याधिकारी प्रीतम पाटील यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते.

दरम्यान, भाजपने शिरूर नगरपरिषद गटाला पाठिंबा जाहीर केल्यानंतर नव्या घडामोडी घडल्या. उपनगराध्यक्ष मितेश गादिया यांच्याविरोधात अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला. त्यामुळे हे पद रिक्त झाले. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी उपनगराध्यक्ष निवडीसाठी विशेष सभा घेण्यात आली. यात नितीन पाचर्णे यांची बिनविरोध निवड झाली. निवडीनंतर नगराध्यक्षा ऐश्वर्या पाचर्णे आणि जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राहुल बाबूराव पाचर्णे यांनी त्यांचे अभिनंदन केले.

Shirur Municipal Council Election
Child Marriage Free India Campaign: बालविवाहमुक्त भारत अभियानाला शाळांची साथ; राज्यभर विद्यार्थ्यांसाठी जनजागृती उपक्रम

यावेळी माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी बी. जी. पाचर्णे, भाजपचे नेते धर्मेंद्र खांडरे, माजी शहराध्यक्ष केशव लोखंडे, एकनाथ शेलार, भगवान शेळके, बाबूराव पाचंगे, अविनाश जाधव यांनी मनोगत मनोगत व्यक्त केले. नगराध्यक्षा ऐश्वर्या पाचर्णे यांनी नितीन पाचर्णे यांच्या संयमी नेतृत्वाचा गौरव केला. सर्वांना विश्वासात घेऊन शहराच्या विकासासाठी काम करणार असल्याची ग्वाही नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष नितीन पाचर्णे यांनी दिली.

यावेळी बांधकाम समितीचे सभापती सुनील जाधव, एजाज बागवान, स्वाती साठे, नगरसेविका सुनीता भुजबळ, रिंकूताई जगताप, संगीता मल्लाव, पूजा पोटावळे, सविता राजापुरे, नगरसेवक संतोष थेऊरकर, सागर नरवडे, उमेश शेळके, नीलेश पवार, राजेंद्र लोळगे, अभिजित पाचर्णे यांच्यासह माजी सरपंच वर्षा पोटावळे, विठ्ठल घावटे, वंदना पाचर्णे, सरपंच जगदीश पाचर्णे तसेच महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. निवडीनंतर नितीन पाचर्णे यांची मिरवणूक काढण्यात आली.

राहुल पाचर्णे गहिवरले

शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी नितीन पाचर्णे यांची निवड झाल्यानंतर आभार मानताना माजी आमदार स्व. बाबूराव पाचर्णे यांचे चिरंजीव राहुल यांना गहिवरून आले. साहेबांचे स्वप्न आज पूर्ण झाले असून, साहेबांनी चार दशकांहून अधिक काळ शिरूर शहरासाठी प्रामाणिकपणे काम केले. नगरपरिषदेच्या नवीन इमारतीमध्ये साहेबांचेही मोठे योगदान असून, हे दोन्ही पाचर्णे नगरपरिषदेच्या सत्तास्थानी असल्याने राहुल पाचर्णे यांच्या डोळ्यांत अश्रू आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.