Shirur Leopard Attack: शिरूर तालुक्यात बिबट्याचा थरार! पाच वर्षांच्या चिमुकलीचा हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू

पिंपळसूटीतील पहाटेची हृदयद्रावक घटना; ग्रामस्थांची वनविभागाकडे तातडीने बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी
Shirur Leopard Attack
Shirur Leopard AttackPudhari
Published on
Updated on

मांडवगण फराटा: शिरूर तालुक्याच्या पूर्व भागातील पिंपळसूटी येथे बुधवारी (दि. २२) पहाटे सुमारे पावणेतीनच्या दरम्यान बिबट्याच्या हल्ल्यात एका पाच वर्षाच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने तातडीने बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

Shirur Leopard Attack
Akshar Wari: संत तुकारामांचा भक्तिमार्ग : भक्ती आणि कर्माच्या संगमातून चित्तशुद्धीचा विज्ञाननिष्ठ संदेश

मिळालेल्या माहितीनुसार, भाग्यश्री संदीप वारे (रा. सध्या पिंपळसूटी, मूळ गाव पाथर्डी, जि. अहिल्यानगर) ही आपल्या कुटुंबासह पिंपळसूटी येथील शेतकरी मच्छिंद्र प्रल्हाद भोसले यांच्या येथे ऊस तोड करण्यासाठी वास्तव्यास होती. बुधवारी पहाटेच्या सुमारास आई-वडील व मुलगी बाहेर गोठ्यामध्ये झोपले होते. अचानक बिबट्याने मुलीवर हल्ला केला. मुलगी मोठ्याने ओरडली. नंतर आई-वडील जागे झाले, परंतु बिबट्याने तोपर्यंत त्या मुलीला ऊसाच्या शेतात ओढत नेले. त्यानंतर स्थानिकांनी भाग्यश्रीचा शोध घेतला असता काही वेळाने तिचा मृतदेह शेतात आढळून आला.

Shirur Leopard Attack
Pune Green Hydrogen Centre of Excellence: पुण्यात 'ग्रीन हायड्रोजन सेंटर ऑफ एक्सलन्स'ची तयारी; एनसीएलकडून हायड्रोजन बसचे सादरीकरण

मिळालेल्या माहितीनुसार, भाग्यश्री संदीप वारे (रा. सध्या पिंपळसूटी, मूळ गाव पाथर्डी, जि. अहिल्यानगर) ही आपल्या कुटुंबासह पिंपळसूटी येथील शेतकरी मच्छिंद्र प्रल्हाद भोसले यांच्या येथे ऊस तोड करण्यासाठी वास्तव्यास होती. बुधवारी पहाटेच्या सुमारास आई-वडील व मुलगी बाहेर गोठ्यामध्ये झोपले होते. अचानक बिबट्याने मुलीवर हल्ला केला. मुलगी मोठ्याने ओरडली. नंतर आई-वडील जागे झाले, परंतु बिबट्याने तोपर्यंत त्या मुलीला ऊसाच्या शेतात ओढत नेले. त्यानंतर स्थानिकांनी भाग्यश्रीचा शोध घेतला असता काही वेळाने तिचा मृतदेह शेतात आढळून आला.

Shirur Leopard Attack
India Sugar Stock: देशात साखरेचा पुरेसा साठा; सट्टेबाजी आणि घाईघाईच्या खरेदीपासून दूर राहा: एनएफसीएसएफ-इस्मा

या घटनेची माहिती वनविभागाला मिळताच भाग्यश्रीचा मृतदेह ताब्यात घेऊन पुढील उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात हलविला आहे. दरम्यान ग्रामस्थांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती.

पिंपळसूटी परिसरात बिबट्याच्या हल्ल्याची ही दुसरी घटना असून, शिरूरच्या पूर्व भागातील बिबट्याच्या हल्ल्याची ही पाचवी घटना असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. विशेषतः शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, मुलांना शाळेत पाठवावे की नाही, अशी चिंता पालक व्यक्त करत आहेत. बिबट्याचे भक्ष्यस्थानी चिमुकली मुले व वयोवृद्ध सापडली असून वनविभाग अजूनही ठोस उपाययोजना कुठेच करत नाही.

Shirur Leopard Attack
Maharashtra Management Quota Fee Misuse: व्यवस्थापन कोट्यातील तिप्पट शुल्काचा गैरवापर? शिक्षण विभागाच्या रडारवर खासगी संस्था

या परिसरात अजूनही अनेक बिबटे मुक्तपणे वावरत असल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. वारंवार घटना घडूनही वनविभागाकडून ठोस उपाययोजना होत नसल्याबद्दल नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करून पिंजरे लावावेत, गस्त वाढवावी तसेच नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

या घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून पुढील पंचनामा व आवश्यक कार्यवाही सुरू केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news