India Sugar Stock: देशात साखरेचा पुरेसा साठा; सट्टेबाजी आणि घाईघाईच्या खरेदीपासून दूर राहा: एनएफसीएसएफ-इस्मा

देशांतर्गत वापरासाठी साखरेची उपलब्धता समाधानकारक; ऑक्टोबरपासून लवकर गाळप हंगाम सुरू करण्यावर उद्योगाची सहमती
Sugar
Sugar Pudhari
Published on
Updated on

पुणे: देशात साखरेची उपलब्धता समाधानकारक उपलब्धता असून देशांतर्गत वापरासाठी आवश्यक साखरेचा पुरेसा साठाही उपलब्ध असल्याचा निर्वाळा केंद्र सरकारला देण्यात आला आहे. त्यामुळे देशांतर्गत साखर बाजारात घाईघाईने खरेदी वाढवून किंवा सट्टेबाजीला उधाण आणून कोणीही बळी पडू नये, असे आवाहन नॅशनल फेडरेशन ऑफ को- ऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीज लिमिटचे (एनएफसीएसएफ) व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे आणि इंडियन शुगर अँड बायो-एनर्जी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे (इस्मा) महासंचालक दीपक बल्लानी यांनी संयुक्तपणे केले आहे.

Sugar
Maharashtra Management Quota Fee Misuse: व्यवस्थापन कोट्यातील तिप्पट शुल्काचा गैरवापर? शिक्षण विभागाच्या रडारवर खासगी संस्था

एनएफसीएसएफ आणि इस्मा या साखर उद्योगाशी संबंधित देशपातळीवरील दोन्ही संस्थांनी केंद्र सरकारच्या प्रतिनिधींसमवेत झालेल्या संयुक्त चर्चेत साखरेच्या उपलब्धतेची माहिती दिली आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, साखर उद्योगाने सध्याच्या कृषी- हवामान परिस्थितीनुसार, २०२६- २७ चा साखर हंगाम शक्य तितक्या लवकर सुरू करण्यास सहमती दर्शविली आहे. हा पुढाकार घेऊन घेतलेला निर्णय, बाजारात सुरळीत साखर पुरवठा होण्यास मदत करेल.

Sugar
Maharashtra Registration Offices Strike: सहदुय्यम निबंधकावर हल्ल्याच्या निषेधार्थ राज्यभर दस्तनोंदणी कार्यालये बंद; २०० कोटींचा महसूल ठप्प

ऊस गाळप ऑक्‍टोबर 2026 मध्ये लवकर सुरू केल्यास 2026-27 च्या येणाऱ्या हंगामात बाजारात नवीन साखरेची आवकही लवकर सुरू होईल. ज्यामुळे देशांतर्गत साखरेचा पुरवठा अधिक होऊन उपलब्धता वाढण्यास मदत होणे अपेक्षित आहे. ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर कारखान्यांचे हित जपत ग्राहकांना वाजवी दरात साखर सहज उपलब्ध करून देण्यासाठी साखर उद्योग हा केंद्र सरकारसोबत मिळून काम करत राहील. साखरेचे स्थिर दर आणि पारदर्शक बाजारपेठ ही ग्राहक, शेतकरी, व्यापारी आणि साखर उद्योगाच्या सामूहिक हिताची असल्याचेही त्यांनी पत्रकात म्हटले आहे.

Sugar
Pune Municipal Corporation Food Testing Machine: महापालिकेची १२ लाखांची फूड टेस्टिंग मशीन अखेर सापडली; १० वर्षे स्टोअररूममध्येच पडून

साखर दरवाढ वास्तविक स्थितीवर आधारित नाही

देशात सध्या साखरेच्या दरात गेल्या पंधरवड्यात झालेली प्रति क्विंटलची 650 रुपयांची वाढ ही मागणी आणि पुरवठ्याच्या वास्तविक स्थितीवर आधारित नाहीत. साखरेचा पुरेसा साठा उपलब्ध असताना तुटवड्याचे चित्र निर्माण केल्याने बाजारात अनावश्यक अस्थिरता निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.

Sugar
Pune Municipal Corporation Security Recruitment: महापालिकेच्या सुरक्षारक्षक भरतीत 'शिफारस'चाच बोलबाला? आयुक्तांच्या कबुलीने खळबळ

त्यामुळे साखर व्यापारात अस्थिरता येऊन ग्राहकांनाही साखर दरवाढीचा भुर्दंड बसण्याची शक्यता आहे. साखरेच्या सट्टेबाजीसाठी खरेदी करणे, साठेबाजी करणे किंवा साखरेच्या उपलब्धतेबाबत दिशाभूल करणारी माहिती पसरवणे आदींपासून व्यापारी, घाऊक विक्रेते, संस्थात्मक खरेदीदार, किरकोळ विक्रेते आणि बाजारातील इतर सहभागींना दूर राहण्याचे आवाहनही नाईकनवरे आणि बल्लानी यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news