Pune Green Hydrogen Centre of Excellence: पुण्यात 'ग्रीन हायड्रोजन सेंटर ऑफ एक्सलन्स'ची तयारी; एनसीएलकडून हायड्रोजन बसचे सादरीकरण

हरित हायड्रोजन परिसंस्था विकासासाठी भागधारकांची बैठक; ९ मीटर लांबीच्या हायड्रोजन बससह 'हायड्रोजन व्हॅली' उपक्रमांवर चर्चा
Hydrogen Bus
Hydrogen BusPudhari
Published on
Updated on

पुणे: शहरातील नॅशनल केमिकल लॅबोरेटरी (एनसीएल)च्या वतीने 'ग्रीन हायड्रोजन इकोसिस्टम डेव्हलपमेंट' (हरित हायड्रोजन परिसंस्था विकास) क्षेत्रातील 'सेंटर ऑफ एक्सलन्स' उभारण्याची तयारी सुरू आहे. संस्थेच्या वतीने या विषयावरील भागधारकांच्या बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी ९-मीटर लांबीच्या, ग्रीन हायड्रोजनवर चालणाऱ्या बसचे सादरीकरण करण्यात आले. बसमध्ये तीन हायड्रोजन सिलिंडर्स बसवले होते.

Hydrogen Bus
India Sugar Stock: देशात साखरेचा पुरेसा साठा; सट्टेबाजी आणि घाईघाईच्या खरेदीपासून दूर राहा: एनएफसीएसएफ-इस्मा

महाराष्ट्र ऊर्जा विकास संस्था (मेडा) आणि राज्य सरकार यांच्या सहकार्याने आयोजित या कार्यक्रमात देशभरातील धोरणकर्ते, उद्योग क्षेत्रातील नेते, संशोधक, तंत्रज्ञान विकासक, शैक्षणिक क्षेत्रातील तज्ज्ञ आणि हायड्रोजन परिसंस्थेशी संबंधित विविध घटकांनी सहभाग घेतला.

Hydrogen Bus
Maharashtra Management Quota Fee Misuse: व्यवस्थापन कोट्यातील तिप्पट शुल्काचा गैरवापर? शिक्षण विभागाच्या रडारवर खासगी संस्था

हायड्रोजन व्हॅलीच्या अनुभवांचे कथन

  • यावेळी भारतातील चारही 'हायड्रोजन व्हॅली' उपक्रमांमधील अनुभव मांडण्यात आले आणि पुणे, कोची, ओडिशा व जोधपूर येथील हायड्रोजन व्हॅलीच्या प्रतिनिधींनी सादरीकरणे केली.

  • परिसंवादात रासायनिक उद्योग, डेटा सेंटर्स आणि दुग्ध व्यवसाय या क्षेत्रांमधील 'ग्रीन हायड्रोजन'च्या (हरित हायड्रोजनच्या) उदयोन्मुख उपयोगांचा आढावा घेण्यात आला.

Hydrogen Bus
Maharashtra Registration Offices Strike: सहदुय्यम निबंधकावर हल्ल्याच्या निषेधार्थ राज्यभर दस्तनोंदणी कार्यालये बंद; २०० कोटींचा महसूल ठप्प

जागतिक हायड्रोजन क्षेत्रात भारताचे स्थान मजबूत आहे. उद्योगांना केवळ स्वतंत्र तंत्रज्ञान विकासापुरते मर्यादित न राहता, मूल्य साखळीतील धोरणात्मक भागीदारीद्वारे सर्वसमावेशक उपाययोजनांकडे वळले पाहिजे.

डॉ. प्रसाद चाफेकर, संचालक, नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय

Hydrogen Bus
Pune Municipal Corporation Food Testing Machine: महापालिकेची १२ लाखांची फूड टेस्टिंग मशीन अखेर सापडली; १० वर्षे स्टोअररूममध्येच पडून

हवामानबदल, पर्यावरणाचा ऱ्हास आणि ऊर्जेबाबतची असुरक्षितता यांचा आर्थिक भार अखेरीस समाजालाच सोसावा लागतो. त्यांनी या व्यापक संदर्भात 'ग्रीन हायड्रोजन'चे मूल्यमापन करणे गरजेचे आहे.

डॉ. आशिष लेले, संचालक, एनसीएल

ग्रीन हायड्रोजन हे केवळ भविष्यातील स्वच्छ इंधनच नाही, तर जागतिक स्तरावर कार्बन उत्सर्जनाबाबतचे नियम कडक होत असताना रासायनिक उद्योगासाठी एक महत्त्वाचे इंधन आहे.

डॉ. प्रशांत ढाकेफळकर, संचालक आघारकर संस्था

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news