Shirur Online Gambling Raid: शिक्रापूरमध्ये ऑनलाईन फनटार्गेट-बिंगो जुगारावर छापा; ₹3.83 लाखांचा मुद्देमाल जप्त

कोरेगाव भीमा व केंदूरमध्ये मोबाईल आयडी-कोडद्वारे सुरू होता बेटिंग रॅकेट; तिघांविरुद्ध गुन्हा, एटीएस व पोलिसांची संयुक्त कारवाई
Shirur Online Gambling Raid
Shirur Online Gambling RaidPudhari
Published on
Updated on

शिक्रापूर: शिरूर तालुक्यातील कोरेगाव भीमा व केंदूर येथे मोबाईलवर आयडी व कोड देऊन पैसे घेऊन ऑनलाईन पद्धतीने फनटार्गेट व बिंगो या प्रकारच्या जुगार खेळला जात होता. यावर दहशतवादविरोधी पथक व शिक्रापूर पोलिसांच्या पथकाने छापा टाकत कारवाई केली.

Shirur Online Gambling Raid
Bhigwan Kidnapping Case: तरुणीचा कुटुंबीयांसोबत जाण्यास नकार; पोलिसांचा तपास सुरू

याप्रकरणी पोलिसांनी अमोल जयसिंग साकोरे व अक्षय रघुनाथ साकोरे (दोघे रा. शिळकवाडी केंदूर, ता. शिरूर) व चंद्रकांत रिटे (रा. बारामती) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक माहितीनुसार, कोरेगाव भीमा, केंदूर येथे दोन युवक लोकांना मोबाईलवर एक आयडी व कोड देऊन पैसे घेऊन ऑनलाईन पद्धतीने फनटारगेट व बिंगो जुगार खेळवत असल्याची माहिती दहशतवादविरोधी पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक प्रकाश पवार यांना मिळाली.

Shirur Online Gambling Raid
Pune Municipal Election Analysis: बिबवेवाडी प्रभाग 20 मध्ये भाजपला धक्का; तीन जागा भाजपच्या, एक राष्ट्रवादीकडे

त्यानुसार सहायक पोलिस उपनिरीक्षक विशाल गव्हाणे, पोलिस हवालदार नीलेश कदम, विशाल भोरडे, गणेश चंदनशिव, पोलिस शिपाई ओंकार शिंदे यांसह शिक्रापूरचे सहायक पोलिस उपनिरीक्षक धनंजय थेऊरकर, विशाल देशमुख यांनी सदर ठिकाणी छापा टाकला.

Shirur Online Gambling Raid
Maharashtra Agricultural Export 2025-26: 31 डिसेंबरअखेर 765 कोटींची शेतमाल निर्यात; महाराष्ट्राची झेप

यावेळी कोरेगाव भीमातून अमोल साकोरे व केंदूर येथून अक्षय साकोरे यांना मोबाईलसह ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता दोघे बारामती येथील चंद्रकांत रिटे याला पैसे पाठवून मोबाईलवर आयडी व कोड घेऊन अन्य लोकांना तो आयडी व कोड देऊन त्याचे पैसे घेऊन मोबाईलवर ऑनलाईन पद्धतीने फनटार्गेट व बिंगो जुगार खेळवत असल्याचे सांगितले.

Shirur Online Gambling Raid
Daund Murder Case: दौंडमध्ये पिकअपची धडक देत कोयत्याने वार; महेश उर्फ मन्या भागवत यांचा खून

दरम्यान, पोलिसांनी दोघांकडून तब्बल पाच महागडे मोबाईल व एक लाख 53 हजार रुपये असा एकूण तीन लाख 83 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत दहशतवाद विरोधी पथकाचे सहायक पोलिस उपनिरीक्षक विशाल शिवाजी गव्हाणे यांनी शिक्रापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अमोल साकोरे, अक्षय साकोरे व चंद्रकांत रिटे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक धनंजय थेऊरकर हे करत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news