Daund Murder Case: दौंडमध्ये पिकअपची धडक देत कोयत्याने वार; महेश उर्फ मन्या भागवत यांचा खून

पांढरेवाडी (मुकादमवाडी) येथे थरारक घटना; तिघे मित्र जखमी, दौंड पोलिसांत गुन्हा दाखल
Daund Murder Case
Daund Murder CasePudhari
Published on
Updated on

कुरकुंभ: दौंड तालुक्यातील पांढरेवाडी (मुकादमवाडी) हद्दीत पिकअप वाहनाने दुचाकीला धडक देऊन कोयता, सतुरने वार करून एका तरूणाचा खुन करण्यात आला. या गंभीर घटनेत खुन झालेल्या तरुणाचे तीन मित्र जखमी झाले आहे. हा प्रकार शुक्रवारी (दि.२०) रात्री घडला.

Daund Murder Case
Pune Cyber Fraud Gas Scam: गॅसपुरवठा खंडित करण्याची भीती; पुण्यात सायबर चोरट्यांकडून १६ लाखांची फसवणूक

महेश उर्फ मन्या संजय भागवत असे खुन झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी आनंद माकर, विकी शितकल, संतोष शितकल (तिघे रा. आंबीकानगर पाटस, ता. दौंड) यासह इतर दोन जणांविरूध्द दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महेश मारूती टुले (वय २५ रा. तामखडा पाटस, ता. दौंड) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीसह युवराज रामदास शिंदे, राज होले अशी जखमींची नाव आहे.

Daund Murder Case
Pune Police Drug Analyzer: नाकाबंदीत ‘ड्रग ॲनालायझर’चा वापर; पुणे पोलिसांची अमली पदार्थांविरोधात नवी मोहीम

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी फिर्यादी आणि त्यांचे मित्र दोन वेगवेगळ्या दुचाकीवरून पाटसकडे जाण्यासाठी निघाले होते. या दरम्यान पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर मुकादमवाडी येथील उड्डाणपुलावर पिकअप वाहनाने दुचाकीला धडक आले दिली. यादरम्यान खाली पाडलेल्या महेश भागवत याच्यावर कोयता व सत्तुरने सपासप वार करून खुन केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news