

रघुनाथ कसबे
बिबवेवाडी: शंकर महाराज मठ-बिबवेवाडी प्रभागात (क्र. 20) महापालिकेच्या 2017 मधील निवडणुकीत चारही जागा भाजपने जिंकल्या होत्या. या निवडणुकीतही निर्विवाद वर्चस्व मिळविण्याचा आत्मविश्वास भाजपच्या नेत्यांना होता. मात्र, राष्ट्रवादी काँग््रेासने भाजपपुढे कडवे आव्हान उभे करीत एका जागेवर यश मिळविले आहे. यामुळे प्रभागावर निर्विवाद वर्चस्व मिळविण्याचे भाजपचे मनसुबे उधळले आहेत.
हा प्रभाग मागील काही वर्षांपासून भाजपचा गड मानला जातो. गेल्या काळात भाजपचे चारही उमेदवार या प्रभागातून बहुमताने निवडून आले होते. यंदाच्या निवडणुकीत प्रभागरचना भाजपला अनुकूल असल्याची चर्चा नागरिकांमध्ये होती. प्रभागातील अनुसूचित जाती प्रवर्गातील मतदार कमी झाल्यामुळे आरक्षणाचा प्रश्न राहिलाच नव्हता. 2017 मधील निवडणुकीत भाजपच्या आमदार माधुरी मिसाळ यांच्या नेतृत्वामुळे आणि विविध विकासकामांमुळे या प्रभागातून भाजपचे चारही उमेदवार भरघोस मतांनी निवडून आले होते. या निवडणुकीत देखील भाजपचे सर्व उमेदवार निवडून येण्याचा आत्मविश्वास पक्षाच्या नेत्यांना होता. मात्र, तसे झाले नाही. या प्रभागात भाजपचे तीन, तर राष्ट्रवादी काँग््रेासने एका जागेवर यश मिळविले आहे.
भाजपने बिबवेवाडी गावठाणातील उमेदवार दिला असता, तर चित्र वेगळेच दिसले असते. तसे पाहिले तर राष्ट्रवादी काँग््रेासकडून निवडून आलेले गौरव घुले यांना जुन्या प्रभागातून (अप्पर इंदिरानगर) दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती. त्या वेळी त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर त्यांनी भाजप सोडून राष्ट्रवादी काँग््रेासमध्ये प्रवेश केला. या निवडणुकीत घुले यांना स्थानिक गावकऱ्यांचे पाठबळ मिळाले. तसेच, भाजपमधून राष्ट्रवादी काँग््रेासमध्ये प्रवेश केलेल्या प्रीतम नागापुरे, माजी नगरसेविका अस्मिता शिंदे, रश्मी अमराळे यांची त्यांना साथ मिळाली. यामुळे घुले यांना एक जागा का होईना भाजपच्या तावडीतून खेचून आणण्यात यश आले आहे.
भाजपकडून मानसी देशपांडे, राजेंद्र शिळीमकर आणि तन्वी दिवेकर यांनी यश मिळविले आहे. देशपांडे आणि शिळीमकर यांनी गेल्या काळात केलेली विकासकामे आणि दांडग्या जनसंपर्कामुळे नागरिकांनी त्यांना पुन्हा एकदा प्रभागाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली आहे. प्रशांत दिवेकर यांनी निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात नियोजनबद्ध प्रचार करून आपली पत्नी तन्वी दिवेकर यांना निवडून आणले आहे.
या प्रभागात शिवसेना (शिंदे गट), काँग््रेास आदी पक्षांकडे तुल्यबळ उमेदवार नसल्यामुळे खरी लढत भाजप आणि राष्ट्रवादी काँग््रेासमध्ये झाली. भाजपच्या उमेदवारांनी नियोजनबद्ध प्रचार केला तसेच राष्ट्रवादी काँग््रेासने भाजपच्या उमेदवारांपुढे कडवे आव्हान उभे केले. कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आणि उद्योजक गणेश घुले यांचा नागरिकांशी असलेला दांडगा जनसंपर्क, वर्षभर राबविलेले विविध सामाजिक, सांस्कृतिक उपक्रम यांचा देखील राष्ट्रवादी काँग््रेासचे उमेदवार गौरव घुले यांना फायदा झाला. तसेच, बिबवेवाडीकरांनी त्यांना साथ दिली. यामुळे प्रभागात निर्विवाद वर्चस्व मिळविण्याचे भाजपचे स्वप्न भंगले आहे.