Bhigwan Kidnapping Case: तरुणीचा कुटुंबीयांसोबत जाण्यास नकार; पोलिसांचा तपास सुरू

बारामती शहर पोलिस ठाण्यात जबाब नोंद; एसपी संदीपसिंग गिल्ल यांची माहिती, तांत्रिक पुराव्यांची तपासणी सुरू
kidnapping
kidnappingPudhari
Published on
Updated on

बारामती: भिगवण येथील अपहरण प्रकरणातील तरुणी बारामती शहर पोलिस ठाण्यात हजर झाल्यानंतर तिचे आई-भावासोबत संभाषण झालेले आहे. मात्र, तरुणीने कुटुंबीयांसोबत जाण्यास नकार दिला, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल्ल यांनी दिली.

kidnapping
Pune Municipal Election Analysis: बिबवेवाडी प्रभाग 20 मध्ये भाजपला धक्का; तीन जागा भाजपच्या, एक राष्ट्रवादीकडे

अपहृत तरुणी संबंधित तरुणासह शुक्रवारी (दि. 20) पहाटे दीड वाजता शहर पोलिस ठाण्यात हजर झाली. पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल्ल हे स्वतः या प्रकरणावर लक्ष ठेवून आहेत. शुक्रवारी सकाळीच ते बारामतीत दाखल झाले. शहर पोलिस ठाण्यात त्यांनी पत्रकारांना तपासाबाबत काही माहिती दिली. गिल्ल म्हणाले की, भिगवण पोलिस ठाण्यात जो गुन्हा दाखल आहे, त्यातील तरुण-तरुणी आमच्याकडे हजर झाले आहेत. या प्रकरणात जाबजबाब नोंदविले गेले आहेत. तरुणीचा न्यायालयासमोर जबाब झाला. जो गुन्हा दाखल झाला आहे, त्यासंबंधी तपास केला जात आहे. तरुणीने आपले मत आई-भावासमोर मांडले आहे.

kidnapping
Maharashtra Agricultural Export 2025-26: 31 डिसेंबरअखेर 765 कोटींची शेतमाल निर्यात; महाराष्ट्राची झेप

व्हिडीओमार्फत तिने जे सांगितले होते तेच तिचे मत आहे. परंतु, कुटुंबीयांचे म्हणणे वेगळे आहे. वेगवेगळी मते व्यक्त होत असल्याने दोन्ही बाजूंनी बारकाईने तपास केला जात आहे. तरुणीने कुटुंबीयांसोबत जाण्यास नकार दिला आहे. एफआयआरमध्ये नमूद बाबी व तरुणीचे म्हणणे हे परस्परविरोधी आहे. फिर्यादीत मिरची पूड टाकल्याचा, मारहाणीचा उल्लेख आहे. त्याचा सखोल तपास केला जात आहे. तपासात जे निष्पन्न होईल, त्यानुसार पुढील कार्यवाही होईल.

तरुणीचे आई-भावासोबत संभाषण झालेले आहे. कुटुंबीय ते का नाकारतात माहिती नाही. कोणत्याही गुन्ह्यात फिर्यादीला तपास अधिकाऱ्याला भेटण्याचा, माहिती घेण्याचा अधिकार आहे, तशी संधी आम्ही त्या कुटुंबाला दिलेली आहे. गेल्या दोन दिवसांत पोलिसांनी या प्रकरणात अनेक तांत्रिक पुरावे मिळविले आहेत. परंतु, अंतिम स्टेटमेंट अद्याप तयार झालेले नाही. फिर्यादीकडून त्या तरुणाच्या चुलत्याबाबत काही आरोप करण्यात आले आहेत, आम्ही सर्व बाजूने तपास करीत आहोत.

kidnapping
Daund Murder Case: दौंडमध्ये पिकअपची धडक देत कोयत्याने वार; महेश उर्फ मन्या भागवत यांचा खून

तरुणीने व्हिडीओत यापूर्वी नऊ वर्षांपासून प्रेमसंबंध असल्याचे सांगितले होते. आता एक वर्षापासून प्रेमसंबंध असल्याचे म्हटले आहे. ही विसंगती आहे. ते व्हिडीओ खरे आहेत का? याची खातरजमा केली जाईल. मिरची पूड टाकणे किंवा मारहाणीबाबत वैद्यकीय तपासणी झालेली आहे. त्याचा अहवाल येताच माहिती दिली जाईल. कायदा आणि सुव्यवस्था राखली जावी, हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. त्यादृष्टीने सर्वच समाजघटकांनी आम्हाला सहकार्य केले आहे. सध्या कायदा आणि सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न नाही, असे गिल्ल म्हणाले. संबंधित तरुण सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे, त्याची चौकशी केली जात आहे, असे गिल्ल यांनी स्पष्ट केले.

kidnapping
Pune Cyber Fraud Gas Scam: गॅसपुरवठा खंडित करण्याची भीती; पुण्यात सायबर चोरट्यांकडून १६ लाखांची फसवणूक

आ. राहुल कुल यांच्याबाबत उल्लेख आढळला नाही

तरुणीच्या नातेवाइकांनी आमदार राहुल कुल यांच्यावर केलेल्या आरोपाबाबत गिल्ल म्हणाले की, मी यावर प्रतिक्रिया देऊ शकत नाही. आमचा तपास गोपनीय माहिती, तांत्रिक माहितीच्या आधारे सुरू आहे. आमच्या तपासात अद्याप यासंबंधी कसलाही उल्लेख आढळलेला नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news