Shikrapur Koyta Gang Assault Case: ‘आम्ही कोयता गॅंगचे आहोत’ म्हणत २० जणांचा हल्ला; शिक्रापूरमध्ये दोन भावांना मारहाण

कार-दुचाकी धडकेनंतर वाद चिघळला; सोनसाखळी व ७० हजारांची रोकड लुटल्याचा आरोप, २० जणांवर गुन्हा दाखल
Assault Case
Assault CasePudhari
Published on
Updated on

शिक्रापूर: शिरूर तालुक्यातील शिक्रापूर येथील तळेगाव रोड येथे कारला दुचाकी धडकून झालेल्या वादातून 20 जणांच्या टोळक्याकडून ‌‘आम्ही कोयता गॅंगचे आहोत‌’ असे म्हणत शिवीगाळ, दमदाटी करीत दोघा भावांना मारहाण करण्यात आली. याप्रकरणी शिक्रापूर पोलिस ठाण्यात 20 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Assault Case
Sinhagad Panshet Forest Fire: सिंहगड-पानशेत जंगलात वणव्यांची मालिका; वनसंपदा जळून खाक

आर्यन गडदरे, सार्थक गावडे, अथर्व साळवे, कार्तिक सांवत, क्रिश चकोर, ओम गायकवाड, सार्थक कराळे, सोहम फिरोदिया याच्यासह 12 साथीदारांवर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी श्रीकांत गोविंद नरके (वय 35, रा. नरकेवाडी, तळेगाव ढमढेरे, ता. शिरूर) यांनी फिर्याद दिली आहे.

Assault Case
Pune International Driving License Demand: पुणेकरांची ‘ग्लोबल ड्रायव्हिंग’ क्रेझ वाढली; २०२५ मध्ये ५,६२३ आंतरराष्ट्रीय परवाने

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीकांत नरके हे त्यांच्या कारने येत असताना पाठीमागून आलेल्या दुचाकीस्वाराने कारला धडक दिली. त्या वेळी दुचाकीवरील दोघे पळून जाऊ लागले. त्यामुळे श्रीकांतचे भाऊ राजेश यांनी दुचाकीवरील आर्यन गडदरे व सार्थक गावडे यांना पकडले. मात्र, ते दोघे राजेशला दमदाटी करू लागले. या वेळी श्रीकांत व राजेश यांनी दोघांना त्यांच्या दुकानात बसविले. त्या दोघांनी फोन करून साथीदारांना बोलावून घेतले.

Assault Case
Bhigwan Girl Kidnapping Case Update: भिगवण अपहरण प्रकरणाला नवे वळण; न्यायालयाने मुलीचा ताबा आईकडे दिला

काही वेळातच टोळक्याने दुकानात येत श्रीकांत व राजेश या दोघा भावांना शिवीगाळ, दमदाटी करीत ‌‘आम्ही कोयता गॅंगचे आहोत...‌’ असे म्हणत हातांनी व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली तसेच कोयत्याने मारण्याची धमकी दिली. या वेळी शेजारील दुकानदारांनी येत दोघा भावांना त्या टोळक्याच्या तावडीतून सोडविले.

Assault Case
Kothrud Ward 29 Development Plan: कोथरूड प्रभाग २९ ‘स्वच्छ व चकाचक’ करण्याचा निर्धार; वाहतूक कोंडी सोडविण्यावर भर

दरम्यान, टोळक्याने श्रीकांतच्या गळ्यातील सोनसाखळी व दुकानातील 70 हजार रुपयांची रोकड जबरदस्तीने काढून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. मारहाणीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. याप्रकरणी पोलिस हवालदार बापू हाडगळे पुढील तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news