Pune International Driving License Demand: पुणेकरांची ‘ग्लोबल ड्रायव्हिंग’ क्रेझ वाढली; २०२५ मध्ये ५,६२३ आंतरराष्ट्रीय परवाने

परदेशात स्वतः गाडी चालवण्याकडे वाढता कल; पुणे आरटीओकडून १०५ देशांत वाहन चालवण्याची अधिकृत मुभा
International Driving License
International Driving License Pudhari
Published on
Updated on

पुणे: परदेशात शिक्षणासाठी, पर्यटनासाठी आणि अन्य उद्योगधंद्यांसाठी जाणाऱ्या पुणेकरांमध्ये स्वत: गाडीचे स्टेअरिंग हाती घेऊन तेथेही ड्रायव्हिंग करण्याची क्रेझ कायम असल्याचे आता दिसून येत आहे. कारण, पुणे आरटीओ कार्यालयामार्फत गेल्या वर्षभरात तब्बल 5 हजार 623 पुणेकरांनी आंतरराष्ट्रीय परवाना (इंटरनॅशनल ड्रायव्हिंग लायसन्स) घेतल्याची नोंद करण्यात आली आहे. यावरून परदेशात गाडी चालवण्याची पुणेकरांची वाढती ग्लोबल क्रेझ कायम असल्याचे चित्र समोर आले आहे.

International Driving License
Bhigwan Girl Kidnapping Case Update: भिगवण अपहरण प्रकरणाला नवे वळण; न्यायालयाने मुलीचा ताबा आईकडे दिला

दि. 1 जानेवारी ते 21 डिसेंबर 2025 या कालावधीत पुणे आरटीओमध्ये आंतरराष्ट्रीय परवान्यासाठी पुणेकरांचा ओघ वाढलेला दिसला. या कालावधीत पुणेकरांनी पुणे आरटीओतून तब्बल 5 हजार 623 जणांनी आंतरराष्ट्रीय वाहन परवाना घेतला आहे, याची नोंद पुणे आरटीओ कार्यालयातील वाहन परवाना विभागात करण्यात आली आहे.

International Driving License
Kothrud Ward 29 Development Plan: कोथरूड प्रभाग २९ ‘स्वच्छ व चकाचक’ करण्याचा निर्धार; वाहतूक कोंडी सोडविण्यावर भर

पुणे आरटीओतून मिळणाऱ्या या आंतरराष्ट्रीय परवान्यामुळे पुणेकरांना जगातील तब्बल 105 देशांमध्ये वाहन चालवण्याची अधिकृत मुभा मिळते. मात्र, त्याकरिता नागरिकांना आवश्यक त्या कागदपत्रांची पुर्तता करणे, अनिवार्य असते, असे आरटीओ अधिकाऱ्यांनी दै. ‌‘पुढारी‌’शी बोलताना सांगितले.

International Driving License
Pune Railway Station Assault Case: पुणे रेल्वे स्टेशनवरील चिमुकलीवरील अत्याचार प्रकरणाची गंभीर दखल; सुरक्षा वाढवण्याचे आदेश

... असा मिळवा आंतरराष्ट्रीय परवाना

  • ‌‘परिवहन‌’ या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज करावा लागतो.

  • पासपोर्ट, व्हिसा, वैध भारतीय वाहन परवाना आणि दोन पासपोर्ट साईज फोटो आवश्यक आहेत. (40 वर्षांवरील व्यक्तींसाठी मेडिकल सर्टिफिकेट - फॉर्म 1 ए अनिवार्य).

  • 1,000 रुपये ऑनलाईन फी भरून कागदपत्रे अपलोड करावी लागतात.

  • ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर आरटीओ कार्यालयातील परवाना विभागात कागदपत्रे जमा करावी लागतात. तिथे अधिकाऱ्यांमार्फत व्हेरिफिकेशन झाल्यावर परवाना सुपूर्द केला जातो.

  • विशेष म्हणजे, एकदा पुण्यात आंतरराष्ट्रीय परवाना काढल्यानंतर तो परदेशातूनही ऑनलाईन पद्धतीने नूतनीकरण करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

International Driving License
Pune Airport Cargo Growth 2025: पुणे विमानतळाची कार्गोमध्ये झेप; देशांतर्गत २३.९% तर आंतरराष्ट्रीय १.८% वाढ

पुणे हे आयटी आणि शैक्षणिक हब असल्याने येथील नागरिकांचा परदेश प्रवास सातत्याने होत असतो. विशेषतः युरोप, अमेरिका आणि आखाती देशांमध्ये स्वतः गाडी चालवण्याकडे पुणेकरांचा कल वाढत आहे. तेथे गाडी चालवण्यासाठी वाहन परवाना आवश्यक असतो, तो आरटीओ कार्यालयातून दिला जात आहे. आंतरराष्ट्रीय वाहन परवाना देण्याची ही प्रक्रिया सुलभ व्हावी, यासाठी आम्ही आरटीओ स्तरावर विशेष लक्ष देत आहोत. या सोयीमुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळत आहे.

स्वप्नील भोसले, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news