वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून 13 जुलैला पहाटे 5 वाजल्यापासून ते सायंकाळी 8 वाजेपर्यंत पुणे ते पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग क्र. 965 आणि पुणे ते बारामती या मार्गावरील जड, अवजड व इतर वाहतूक बंद करून अन्य पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे. जेजुरी पोलिस स्टेशन, पुणे ग्रामीण हद्दीतील वाहतूक सातारा, फलटण, लोणंद, बारामती येथून पुणे येथे जाण्याकरिता जेजुरी सासवडकडे येणारी जड, अवजड व इतर वाहतूक पूर्णपणे बंद करून त्यावरील वाहने ही निरा-मोरगाव-सुपा ते केडगाव चौफुला मार्गे पुणे-सोलापूर महामार्ग क्रमांक 65 वरून पुणे या मार्गे वळविण्यात येणार आहेत. पुण्याकडून बारामतीकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद करून बेलसर- कोथळे- नाझरे सुपे-मोरगाव रस्ता मार्गे बारामती-फलटण- सातारा या मार्गे वळविण्यात येणार आहे.