Shahu Maharaj Archives: शंभुपुत्र शाहू महाराजांचा इतिहास अजूनही ‘नजरकैदेत’

पुण्यातील पेशवे दफ्तरात मौल्यवान दस्तऐवज बंदिस्त; संशोधकांना परदेशात जावे लागते, अटी-शर्तींवर टीका
Shahu Maharaj Archives
Shahu Maharaj ArchivesPudhari
Published on
Updated on

आशिष देशमुख

पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांचे नातू तथा छत्रपती संभाजीराजांचे पुत्र छत्रपती शाहू महाराज यांचे अवघे दफ्तर पुण्यातील ‌‘पेशवे आर्काईव्हज्‌‍‌’ या सरकारी इमारतीत अजूनही बंदिस्त आहे. हा इतिहास उपलब्ध होण्यासाठी शासनाकडून अनेक अटी अन्‌‍ शर्ती घातल्या आहेत. त्यामुळे इतिहास संशोधकांना थेट लंडनमधील बिटीश लायबरीत जाऊन अभ्यास करावा लागला. संदर्भ साहित्याचा अभ्यास करण्यासाठी अशा अटी-शर्ती लागू केल्या, तर छत्रपती शाहू महाराजांचा इतिहास नव्या पिढीला कळणार कसा? अशी खंत इतिहासतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

Shahu Maharaj Archives
Pune ZP Election Result Live: पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एकहाती सत्ता; किती जागा जिंकल्या?

इतिहास संशोधकांच्या मते, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे दफ्तर त्या काळात बादशाह औरंजेबाने नष्ट करून टाकले. त्यामुळे त्या काळातील अगदी मोजकी कागदपत्रे पाहावयास मिळतात. मात्र, महाराजांचे नातू तथा शंभुपुत्र छत्रपती शाहू महाराज यांचे संपूर्ण दफ्तर पुण्यातील ‌‘पेशवे आर्काईव्हज्‌‍‌’ या सरकारी इमारतीत आहे. मात्र, ते बंदिस्त अवस्थेत आहे. त्यावर कुणाला अभ्यास करण्याची परवानगी दिली जात नाही. त्यामुळे छत्रपती शाहू महाजांवर संशोधन करणाऱ्या अभ्यासकांना एकवेळ बिटीश लायबरीत प्रवेश मिळू शकतो; पण पुण्यातील पेशवे दफ्तरात मिळत नाही. ही शोकांतिका इतिहास संशोधकांनी जाहीरपणे बोलून दाखवली आहे. हा सर्व प्रकार भयंकर असून, संतापजनक असल्याचे मतही त्यांनी नोंदविले आहे.

Shahu Maharaj Archives
Pune Municipal Corporation: महापालिकेत आलिशान गाड्यांची खरेदी; जुन्या वाहनांचा हिशेब कुठे?

इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे काय म्हणाले..?

पुण्यातील पेशवे आर्काईव्हज्‌‍ या सरकारी इमारतीत छत्रपती शाहू महाराजांचे दफ्तर 42 हून अधिक रुमालांत दडलेले आहे. ती सर्व कागदपत्रे मोडी लिपीत आहेत. त्यामुळे सरकारी पातळीवर इतक्या मोठ्या कागदपत्रांचा अभ्यास करायचा कसा? यावर अद्याप विचार कुणी केला नाही. बिटीश लायबरीत जाऊन डॉ. शिंदे यांनी छत्रपती शाहू महाराजांवर अभ्यास केला आणि हा सुंदर ग््रांथ 1934 नंतर तब्बल 92 वर्षांनी प्रकाशित केला. त्यांच्या अपार कष्टाला तोड नाही.

काय म्हणाले डॉ. पी. एन. शिंदे..?

मी शंभुपुत्र छत्रपती शाहू महाराजांचे चरित्र अभ्यासायला सुरुवात केली. तेव्हा प्रथम पुण्यातील पेशवे आर्काईव्ह या ठिकाणी आलो होतो. मात्र, मला मोडी लिपी येत नसल्याने माझ्यासोबत एक मोडी लिपीचा तज्ज्ञ आणतो. मला अभ्यासाची परवानगी द्या, अशी विनंती मी पेशवे दफ्तरातील कारभारी लोकांना केली. मात्र, तुम्ही एकटे येऊ शकता. सोबत कुणी आणता येणार नाही, अशी विचित्र अट घातली. मी छत्रपती शाहू महाराजांवर प्रसिद्ध असलेल्या संदर्भांचा अभ्यास केला. नंतर लंडन येथील बिटीश लायबरीत जाऊन सातत्याने तेथील छत्रपती शाहू महाराजांच्या दस्तऐवजांचा अभ्यास केला अन्‌‍ त्यावरून हा ग््रांथ आकाराला येऊ शकला.

Shahu Maharaj Archives
Folk Literature Committee: लोकसाहित्य समिती अस्तित्वात, पण काम ठप्प; निधी असूनही प्रकल्प रखडले

पेशवे दफ्तरात प्रवेशासाठीच्या अटी व्हाव्यात शिथिल

खरेतर पेशवे दफ्तरात इतिहास संशोधकांना जाण्याची मुक्त परवानगी हवी. आता माझे वय 80 आहे. या वयात मला नव्याने मोडी लिपी शिकणे शक्य नाही. त्यामुळे सोबत मोडी लिपीच्या जाणकाराला प्रवेश मिळाला, तर इतिहास अधिक स्पष्टपणे समोर येईल. पेशवे दफ्तराच्या आत जाण्यासाठी लवकर परवानगी मिळत नाही. ती मिळाली तर इथल्या अटी खूप जाचक आहेत. त्या शिथिल केल्या तरच संशोधक, जिज्ञासूंना अभ्यास करता येईल, असे डॉ. पी. एन. शिंदे यांनी सांगीतले.

Shahu Maharaj Archives
Pune Zilla Parishad election: ...पुणे जिल्हा परिषदेच्या उद्याच्या फैसल्याकडे लक्ष; ‘दादांची छाया’ कायम राहणार का?

असे आहे हे पुरालेखागार...

कौन्सिल हॉलसमोर हे कार्यालय आहे. राज्य शासनाच्या पुराभिलेख संचालनालयाच्या अखत्यारीत येते. याला पुणे पुरालेखागार असे शासकीय नाव आहे. तसेच ते पेशवे दफ्तर म्हणूनही ओळखले जाते.

आशियातील सर्वांत मोठ्या अभिलेखागारांपैकी एक असलेल्या पुणे पुरालेखागाराच्या इमारतीचे बांधकाम 7 जुलै 1877 रोजी सुरू झाले आणि 1 सप्टेंबर 1891 रोजी पूर्ण झाले.

येथे उपलब्ध असलेल्या नोंदी पूर्वी शनिवारवाड्यातील एका दफ्तरात ठेवल्या होत्या; परंतु त्या इमारतीला आग लागली. त्यामुळे अनेक महत्त्वाची कागदपत्रे नष्ट झाली.

नवीन दफ्तर हे इंग््राजांनी बांधले असून, पुन्हा आग लागू नये, याची काळजी घेत दगडांनी बांधले. या इमारतीत 1666 ते 1890 या काळातील कागदपत्रांचा संग््राह आहेत.

कागदपत्रे 39 हजारांपेक्षा जास्त कापडी गठ्‌‍ठ्यांमध्ये बांधून ठेवली आहेत, ज्यांना रुमाल म्हणतात.

प्रत्येक गठ्‌‍ठ्यात 1,800 ते 2,000 कागदपत्रे आहेत. हे गठ्ठे एकमेकांवर रचून ठेवलेले आहेत. अभिलेखागारातील सर्व कागदपत्रांची एकूण संख्या अंदाजे पाच कोटी आहे.

Shahu Maharaj Archives
MERC Electricity Tariff: वीजदरवाढीवर तिसरी ई-जनसुनावणी; एमईआरसीच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह

छत्रपती शाहू महाराजांवरील दुसरे चरित्रग्रंथ प्रकाशित होण्यास लागली 92 वर्षे

पुण्यातील भारत इतिहास संशोधक संस्थेत नुकतेच शंभुपुत्र छत्रपती शाहू महाराज यांच्यावरचा अभ्यासपूर्ण ग््रांथ सातारा येथील इतिहास संशोधक डॉ. पी. एन. शिंदे यांनी 25 जानेवारी 2026 रोजी प्रकाशित केला. या वेळी त्यांना संदर्भ मिळविण्यासाठी लंडनच्या बिटीश लायबरीत जावे लागले, असे सांगितले. ते म्हणाले की, यापूर्वी छत्रपती शाहू महाराजांवर 1934 मध्ये शिवाजी विद्यापाठीचे कुलगुरू प्रा. आप्पासाहेब पवार यांनी ग््रांथ प्रकाशित केला होता. त्यानंतर तब्बल 92 वर्षांनी हा दुर्मीळ विषयावरचा ग््रांथ प्रकाशित होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news