

राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांसाठी 7 फेब्रुवारी रोजी मतदान पार पडलं होतं. आज, 9 फेब्रुवारीला या सर्व निवडणुकांचा निकाल जाहीर झाला आणि पुणे जिल्हा परिषदेत अजित पवारांच्या राष्ट्रवादीने विजय मिळवला आहे.
या निवडणुकीत पुणे जिल्हा परिषदेसाठी 73 गटांमध्ये जवळपास 299 उमेदवार मैदानात होते. तर 13 पंचायत समित्यांच्या 146 गणांसाठी सुमारे 528 उमेदवारांनी आपलं नशीब आजमावलं. त्यामुळे पुण्यात नेमकी कोणाची सत्ता येणार, कोणता पक्ष आघाडी घेणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं होतं.
निकालाच्या आकडेवारीनुसार, पुणे जिल्हा परिषदेत अजित पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीने थेट बहुमत मिळवत एकहाती सत्ता स्थापन केली आहे. राष्ट्रवादीने तब्बल 39 पेक्षा जास्त जागांवर विजय मिळवला असून 37 चा बहुमताचा आकडा त्यांनी सहज पार केला.
ग्रामीण भागात केलेलं संघटन, स्थानिक प्रश्नांवर लक्ष आणि मजबूत उमेदवारांची निवड, या सगळ्याचा फायदा राष्ट्रवादीला झाल्याचं चित्र आहे. अनेक ठिकाणी चुरशीच्या लढती पाहायला मिळाल्या, पण शेवटी राष्ट्रवादीने निर्णायक आघाडी घेतली.
या निकालामुळे पुणे जिल्हा परिषदेत आता राष्ट्रवादीचं वर्चस्व प्रस्थापित झालं आहे. पुढील काळात जिल्ह्याच्या विकासकामांची दिशा काय असेल, नवनिर्वाचित प्रतिनिधी कोणत्या मुद्द्यांना प्राधान्य देतील, याकडे आता पुणेकरांचं लक्ष लागलेलं आहे.
एकुण जागा - 73 पैकी 67 जागांचा निकाल - बहुमताचा आकडा - 37
भाजप- 9
शिवसेना- 4
राष्ट्रवादी- 47
शरद पवार गट - 1
ठाकरे गट- 6
काँग्रेस- 0
अपक्ष - 0
पुणे- ( 75 जागा )
भाजप-- 07
शिवसेना--13
कॉग्रेस-- 07
राष्ट्रवादी-- 44
इतर-- 04
पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची सत्ता
एकुण जागा - 73 पैकी 55 जागांचा निकाल
भाजप- 7
शिवसेना- 4
राष्ट्रवादी- 40
शरद पवार गट - 1
ठाकरे गट- 3
काँग्रेस- 0
अपक्ष - 0
बहुमत 37 चा आकडा केला पार
मावळ तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसने मोठं यश मिळवत राजकीय ताकद दाखवून दिली आहे. निकालानंतर तालुक्यातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे.
कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, जनतेनं राष्ट्रवादीला भरभरून पाठिंबा देत जवळपास सर्व जागांवर कौल दिला आहे. या आनंदाच्या क्षणी अजित पवार आपल्यात नाहीत, ही खंतही अनेकांच्या शब्दांतून व्यक्त झाली.
एका पदाधिकाऱ्याने सांगितलं की, मावळच्या जनतेनं हा कौल देत पक्षाच्या नेतृत्वामागे ठामपणे उभं राहण्याचा संदेश दिला आहे. पुढील काळात सुनेत्रा पवार यांच्या पाठीशीही कार्यकर्ते एकजुटीनं उभे राहतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
शिरूर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस- अजित पवार पक्षाच्या वृषाली वाळके पोस्टल मतासह 56 मतांनी विजयी. भाजपकडून फेर मोजणीची मागणी.
पुणे जिल्हा परिषदेतील 73 पैकी 25 जागांचे निकाल हाती आले आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर पार पडलेल्या या निवडणुकीत मतदारांनी अजित पवारांच्या पक्षाला भरभरुन मतदान केल्याचे दिसते. निकाल जाहीर झालेल्या 25 पैकी 15 जागांवर अजित पवारांच्या पक्षाचा विजय झाला आहे. तर भाजप- 5, शिवसेना- 3, शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गट प्रत्येकी एका जागेवर विजयी झाला आहे. काँग्रेसला भोपळाही फोडता आलेला नाही. तर भोरमधून अपक्ष चंद्रकांत बाठे विजयी झाले आहेत.
घोडेगाव पेठ जिल्हा परिषद गटातून शिवसेना शिंदे गटाच्या सुवर्णा दरेकर विजयी
पाबळ केंदूर जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे प्रफुल्ल शिवले आघाडीवर
टाकवे बु: अनंता पावसे (राष्ट्रवादी)
इंदूरी: पल्लवी दाभाडे (राष्ट्रवादी)
खरकाळे : दीपाली हुलावले (राष्ट्रवादी)
कुसगाव बु: संतोष राऊत (राष्ट्रवादी)
सोमटणे: मनीषा मुरे (राष्ट्रवादी)
एकूण जागा : 12
राष्ट्रवादी अजित पवार : 1 विजयी, 9 जागांवर आघाडीवर.
भाजप : 02 विजयी ( सुपे आणि शिरसुफळ गण)
आंबेगाव तालुका
एकूण जागा 5
राष्ट्रवादी अजित पवार 2
राष्ट्रवादी शरद पवार 2
शिवसेना शिंदे 1
शिवसेना ठाकरे 0
भाजप ०
आंबेगाव पंचायत समिती
एकूण जागा 10
राष्ट्रवादी अजित पवार 7
राष्ट्रवादी शरद पवार 2
शिवसेना शिंदे
शिवसेना ठाकरे 1
भाजप ०
खेडच्या कुरुळी गटातून भोसरीचे आमदार विलास लांडे यांची मुलगी विनया मुंगसे विजयाच्या वाटेवर. विजयाचे श्रेय जनता आणि वडिलांना, विनया यांची प्रतिक्रिया.
रांजणगाव जिल्हा परिषद गटातून भाजपच्या स्वाती पाचुंदकर 2195 मतांनी आघाडीवर...स्वाती पाचुंदकर यांची विजयाकडे वाटचाल....
पाईट जिल्हा परिषद गटातून आमदार बाबाजी काळे यांच्या भगिनी राजश्री जैद आघाडीवर... माजी जिल्हा परिषद शरद बुट्टे पाटील यांच्या पत्नी सुनिता बुट्टे पिछाडीवर...
एकूण जागा 16
राष्ट्रवादी अजित पवार 2 आघाडी
भाजप : 0
(भिगवण शेटफळगढे जिल्हा परिषद मोजणी सुरू)
4 फेरी अखेर राजगड तालुक्यातील वेल्हे बुद्रुक जिल्हा परिषद गट
शिवाजी चोरगे (भाजपा):- 6568
तानाजी मांगडे (राष्ट्रवादी):- 6391
वांगणी गण
संदीप खुटवड( राष्ट्रवादी):- 2812
विजय चोरगे (उद्धव ठाकरे):- 2320
विशाल वालगुडे (भाजप):- 2645
वेल्हे बुद्रुक गण
सीता खुळे (राष्ट्रवादी):- 3390
निलेश पवार (भाजप):- 1968
पुणे जिल्हा परिषद हवेली तालुका यातील गट क्रमांक 37 पेरणे लोणीकंद गटातून साकोरे 3051 मतांनी विजयी.
किरण साकोरे यांना मिळालेली मते=15234
प्रदीप वसंत कंद 12183
पंचायत समिती लोणीकंद गण क्रमांक
73
मोनिका कंद 4486 मतांनी विजयी
मोनिका कंद मिळालेली मते -8722
लोचन शिवले =4236
पेरणे 74
राणी वाळके 292 मतांनी विजयी
राणी वाळके मिळालेली मते: 7267
संगीता वाळके मिळालेली मते=6975
लोणीकंद पेरणे गट व गण भाजपा उमेदवार तिन्ही विजयी
राष्ट्रवादीच्या शामल सुनील वाबळे या 7304 मतांनी विजयी. वाबळे यांना 9533 मते. भाजपच्या सोनाली प्रमोद खराडे पराभूत. खराडे यांना 2229 मते.
पुणे जिल्ह्यातील शिरूर- न्हावरा गटात भारतीय जनता पार्टीच्या मालती पाचरणे विजयी तर शिरूर ग्रामीण गणात राष्ट्रवादीच्या स्वाती घावटे विजयी न्हावरे गणात राष्ट्रवादी चे दीपक कोहकडे विजयी
पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या मतमोजणीत इंदापूर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसला महत्त्वाचं यश मिळालं आहे. प्राथमिक माहितीनुसार राष्ट्रवादीच्या हेमा माडगे यांनी प्रतिस्पर्ध्यांवर मात करत विजय मिळवला आहे. पुढील निकालांकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे.
पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या मतमोजणीत मावळ तालुक्यात सुरुवातीचे चित्र स्पष्ट होत आहे. उपलब्ध माहितीनुसार 5 जिल्हा परिषद जागांपैकी 3 जागांवर अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पुढे आहे, तर उर्वरित 2 जागांवर भाजप आघाडीवर आहे. पुढील फेऱ्यांत आकडे बदलण्याची शक्यता असून, अंतिम निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या मतमोजणीला आज सुरुवात झाली असून, सुरुवातीचे कल स्पष्ट होऊ लागले आहेत. जिल्ह्यात सध्या अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीवर असल्याचं चित्र आहे.
दरम्यान, भोर तालुक्यात भाजपाने खाते उघडत पहिला विजय नोंदवला आहे. ज्ञानेश्वर पांगरे यांनी विजय मिळवला असून, भाजपासाठी हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. पुढील फेऱ्यांत चित्र कसं बदलतं, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
आंबेगाव तालुक्यात सुरू असलेल्या मतमोजणीत शिंदे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष देविदास दरेकर यांच्या पत्नी सध्या पिछाडीवर असल्याची माहिती समोर येत आहे. सुरुवातीच्या फेऱ्यांत प्रतिस्पर्धी उमेदवाराला आघाडी मिळाल्याचं चित्र आहे.
शिरूरमध्ये सुरू असलेल्या मतमोजणीत माजी आमदार पोपटराव गावडे यांचे चिरंजीव आणि भाजप उमेदवार राजेंद्र गावडे सध्या आघाडीवर आहेत. सुरुवातीच्या फेऱ्यांत त्यांना मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं चित्र आहे.
आंबेगाव पुणे
पारगाव जारकरवाडी गटात अरुण गिरे 434 मतांनी आघाडीवर
दिलीप वळसे पाटलांचा पुतण्या विवेक वळसे पाटीलांना दणका
एकूण जागा - 73
एकूण उमेदवार - 299
अपक्ष- 299 पैकी 61
राष्ट्रवादी काँग्रेस - 72
भाजप - 58
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष - 7
काँग्रेस - 15
शिवसेना - 39
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे - 26
अपक्ष - 61
जिल्ह्यातील एकूण पंचायत समित्या- 13
प्रत्येक पं.समितीत किती जागा- 146
प्रत्येक पं.समितीत किती उमेदवार- 528
उत्तर पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या टपाली मतमोजणीत सध्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी गटाने आघाडी घेतली आहे. जुन्नर, आंबेगाव, खेड आणि मावळ तालुक्यांत टपाली मतमोजणी सुरू असून, सुरुवातीच्या फेऱ्यांत राष्ट्रवादीचं वर्चस्व दिसून येत आहे.
बारामतीतील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या मतमोजणीला आज सकाळी 10 वाजता सुरुवात होणार आहे. दरम्यान, अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते अजूनही भावनिक आहेत. अशा पार्श्वभूमीवरही या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला आघाडी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, निकालाकडे संपूर्ण परिसराचं लक्ष लागलं आहे.
पुणे जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचा निकाल आज जाहीर होणार असून, जिल्ह्याच्या राजकारणात कोणाचं वर्चस्व राहणार याबाबत उत्सुकता आहे. जिल्हा परिषदेच्या 73 आणि पंचायत समितीच्या 146 जागांसाठी झालेल्या या निवडणुकीने सर्वच पक्षांची ताकद पुन्हा एकदा पणाला लावली आहे.
यंदा जिल्ह्यात सरासरी सुमारे 68.89 टक्के मतदान झालं. मागील निवडणुकीच्या तुलनेत ही टक्केवारी थोडी कमी असली, तरी ही लढत केवळ आकड्यांपुरती मर्यादित राहिलेली नाही. ग्रामीण प्रश्न, स्थानिक नेतृत्व आणि पक्षीय समीकरणं यामुळे पुढचं राज्याचं राजकारण बदलणार आहे.
मतदानाच्या टक्केवारीकडे पाहिल्यास तालुक्यांमध्ये मोठा फरक दिसतो. वेल्हे तालुक्यात तब्बल 79.30 टक्के सर्वाधिक मतदान झाले. याउलट बारामतीत केवळ 54.90 टक्के मतदान झालं. बारामतीतील निवडणूक राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत असून, प्रचारातील मर्यादा, स्थानिक वातावरण आणि मतदारांमधील उदासीनता ही संभाव्य कारणं मानली जात आहेत. इतर तालुक्यांमध्येही मतदानाची चित्र बदललं आहे, मावळ, भोर, शिरूर आणि खेडमध्ये चांगला प्रतिसाद दिसून आला, तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचं मतदान झालं.
या निवडणुकीतला सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे सत्ताधारी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आपली पकड कायम ठेवणार की विरोधकांना म्हणजेच शिवसेना अथवा भाजपला संधी मिळणार? मागील काही वर्षांत जिल्ह्यात राजकीय समीकरणं बदलली असून, अनेक ठिकाणी नवं नेतृत्व पुढे आलं आहे. त्यामुळे स्पष्ट बहुमत मिळणार की त्रिशंकू परिस्थिती निर्माण होणार, याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत.
ग्रामीण भागातील पाणीटंचाई, रस्त्यांची अवस्था, आरोग्य सुविधा, शिक्षण आणि रोजगार हे मुद्दे प्रचारात केंद्रस्थानी होते. मात्र अनेक ठिकाणी स्थानिक नेते, गटबाजी आणि व्यक्तिकेंद्रित लढती निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. शेवटच्या टप्प्यात मोठ्या सभा टाळून थेट मतदारांशी संवाद साधण्यावर भर देण्यात आल्याचंही अनेक भागांत पाहायला मिळालं.
जुन्नर : 61.18
आंबेगाव : 65.30
शिरूर : 75.59
खेड : 75.46
मावळ : 77.43
मुळशी : 63.79
हवेली : 68.02
दौंड : 65.00
पुरंदर : 68.37
वेल्हे : 79.30
भोर : 75.62
बारामती :54.90
इंदापूर : 65.67
एकूण 68.89
पुणे--( 75 जागा )
भाजप-- 07
शिवसेना--13
कॉग्रेस-- 07
राष्ट्रवादी-- 44
इतर-- 04